Budget 2025: अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार?

    0
    321

    अकोला दिव्य न्यूज : What gets cheaper, what gets expensive in Union budget 2025 Full List: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर करत असताना सीमा शुल्कात बरेच बदल केले आहेत, ज्याचा फायदा औषधे ते औद्योगिक वस्तूंपासून अनेक क्षेत्रांना होणार आहे. २०२४ साली सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात १० क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला. शेती, उत्पादन, रोजगार, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे.

    •कोणत्या क्षेत्रातील वस्तू स्वस्त होणार?•

    • सरकारने ३७ पेक्षा अधिक औषधांवरील मुलभूत सीमा शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोग आणि इतर दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ३६ औषधांवरील मुलभूत सीमा शुल्कात सूट देण्याचा प्रस्ताव आहे.
    • केंद्र सरकारने कोबाल्ट उत्पादने, LED, झिंक, लिथियम-आयन बॅटरी आणि १२ महत्त्वाची खनिजांवरील सीमा शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
    • जहाजांच्या बांधणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर आणखी १० वर्षांसाठी सीमाशूल्क माफ करण्यात आले आहे.
    • फिश पेस्ट्युरीवरील सीमाशुल्क ३० टक्क्यांवरून ५ टक्क्यावर आणले जाणार आहे.
    • हस्तकला बाजारपेठेला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे.
    • ओल्या निळ्या चामड्याला सीमा शुल्कातून सूट देण्यात येणार आहे, यामुळे चामड्याच्या उद्योगाला चालना मिळेल •या क्षेत्रातील वस्तू महाग होण्याची शक्यता•
    • इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!