पुन्हा अग्नितांडव ! आता जुना आखाड्याला लागली आग, १५ टेंट जळाले

    0
    278

    अकोला दिव्य न्यूज : Mahakumbh Mela Fire: प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. काही दिवसापूर्वी या मेळामध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा आग लागल्याची बातमी समोर आली आहे. चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत १५ तंबू जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले. तेथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अग्निशमन दलाला तंबूपर्यंत पोहोचण्यास अडचण आली. असे असूनही, अग्निशमन दल वेळेवर पोहोचले आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली.

    १९ जानेवारीलाही आग लागली होती : महाकुंभाच्या जत्रा परिसरात १९ जानेवारी रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास आग लागली होती. शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली. आगीत गीता प्रेसच्या १८० कॉटेज जळून खाक झाल्या.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!