अकोला दिव्य न्यूज : आशियातील सर्वात मोठी संस्था असलेल्या बुलढाणा अर्बनचे आतापर्यंत कार्यकारी संचालक म्हणून सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावलेले डॉ. सुकेश झंवर यांची नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ.झंवर यांनी काल सोमवार २७ जानेवारीपासून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहे.बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदी सुकेश झंवर यांची संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड केली गेली आहे. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे ते जावई आहेत.
मूळचे अमरावतीचे रहिवासी आणि यवतमाळमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणारे पहिले बालरोगतज्ञ डॉ.झंवर यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७५ रोजी बृजमोहन सीताराम झंवर आणि त्यांच्या विद्वान पत्नी सरोज झंवर यांच्या कुटुंबात झाला. बृजलाल व सरोज झंवर हे एक प्रतिष्ठित दांपत्य, सामाजिक कार्याची आवड असलेल्या या दाम्पत्यातील सरोजताई यांनी माहेश्वरी महिला मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. तर बृजलाल यांनी महेश पतसंस्थेचे संचालक म्हणूनही कमकाज बघितले आहे.
अशा दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा सुकेश यांनी यवतमाळ येथील गुरुकुल ज्ञानपीठात प्रारंभीक शिक्षण घेतले. तर यवतमाळच्या विवेकानंद माध्यमिक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.शालेय जीवनात अभ्यासासोबतच सुकेश यांना खेळण्याची आवड होती. विशेषतः क्रिकेट आणि बुद्धिबळ हे त्यांचे आवडते खेळ आहे. बुलढाणा अर्बनच्या यशस्वी वाटचालीत संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि संचालक यांच्या सोबत डॉ.झंवर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आता, अध्यक्षपदाची सूत्रे सुकेश झंवर यांच्या रुपाने तरुणांकडे आल्याने युवावर्गात उत्साह संचारला आहे.