अकोल्यात राज ठाकरेंना धक्का ! महिला शिलेदाराचा अर्ज छाननीत बाद

0
अकोल्यात राज ठाकरेंना धक्का ! महिला शिलेदाराचा अर्ज छाननीत बाद
Oplus_131072

अकोला दिव्य ऑनलाईन : स्वबळावर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अकोल्यात धक्का बसला आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवार प्रशंसा मनोज अंबेरे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या महिला शिलेदाराचा अर्ज वय कमी असल्याने बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर आज बुधवार ३० ऑक्टोबरपासून सर्व उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या सौ. प्रशंसा मनोज अंबेरे यांचा अर्ज बाद झाला आहे. अंबेरे या अकोल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने 138 उमेदवार जाहीर केले होते, मात्र आता एक अर्ज बाद झाल्यामुळे मनसेचे 137 अधिकृत उमेदवार असतील.

अर्ज बाद होण्याचे कारण काय?
प्रशंसा अंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशांत यांचा अर्ज रद्द करम्यात आला आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. मात्र प्रशंसा अंबेरे यांचे वय 24 वर्षे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांनी त्यांची संधी हुकली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here