अकोला आयुर्वेद औषधालयात (बैद्यनाथ) धन्वंतरी जयंती साजरी

0
अकोला आयुर्वेद औषधालयात (बैद्यनाथ)  धन्वंतरी जयंती साजरी

अकोला दिव्य ऑनलाईन : आयुर्वेद भगवान धन्वंतरी जयंती की जयंती निमित्त अकोला आयुर्वेद औषधालय ( बैद्यनाथ ) येथे पूजा संचालक निलेश कमलकांत शर्मा यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांची पूजा-अर्चना करुन मोठ्या हर्षोल्लासात जयंती साजरी करण्यात आली. भगवान धन्वंतरी देवांचे चिकित्सक होते.भगवान विष्णुचे अवतार म्हणून त्यांची पूजा अर्चा केली जाते.आयुर्वेदाची त्यांनी उत्पत्ती केली आहे. ईश्वराने सर्वश्रेष्ठ मनुष्य शरीर दिले आहे. तेव्हा प्राकृतिक स्वरुपात शरीराला निरामय ठेवून जीवनाच्या प्रमुख उद्देशाच्या दिशेने निरंतर गतीशील राहावे, असे यावेळी कमलकांत शर्मा यांनी आवाहन केले.

यावेळी शरद मिश्रा, राजेश कमलकांत शर्मा, ललित कुमार शर्मा, राधेश्याम शर्मा, वैद्य डॉ चव्हाण, जैन साहेब, राठोड साहेब, शेरेकर, बजरंग खंडेलवाल, शाम खेतान, सौ. मीनाक्षी शर्मा, सौ.सविता शर्मा, सौ.श्वेता शर्मा, यशोधरा शर्मा, ऋतुपर्णा शर्मा, धनंजय शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here