अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह सर्वच लहान मोठे पक्ष-आघाड्यांमध्ये जागावाटप व उमेदवारी वाटप या दोन्ही प्रक्रियांनी वेग घेतला आहे. अवघ्या दोन दिवसानंतर अर्थात २२ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील पक्षीय बलाबलानुसार जागावाटप व उमेदवार निश्चितीचं गणितं लावल जात आहे. मात्र, महाराष्ट्रातल्या अशा ३१ जागा आहेत, जिथे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही आघाड्या काठावर आहेत. त्यामुळे या ३१ जागा यंदाच्या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाची किती ताकद आहे. हे त्या पक्षाच्या आमदारांच्या संख्येवरून ठरतं. मात्र, त्याचाच विचार करता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ३१ मतदारसंघ असे आहेत, जिथे विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये मतांचं अंतर पाच हजारांहून कमी होतं ! त्यातही या ३१ मतदारसंघांची विभागणी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जवळपास समसमान अर्थात १६ आणि १५ अशी आहे. त्यामुळे या ३१ मतदारसंघांवर सगळ्यांचं लक्ष असेल.
यंदाच्या लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडीनं ३१ जागांवर विजय मिळवला असून सत्ताधारी महायुतीकडे अवघ्या १७ जागा गेल्या. त्यामुळे राज्यात मतदारांचा कौल विरोधकांच्या बाजूने असल्याचं गणित राजकीय विश्लेषक मांडू लागले आहेत. आकडेवारीचा विचार करता महाविकास आघाडीकडे असणाऱ्या ३१ लोकसभा मतदारसंघांनुसार एकूण १५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे. तसं झाल्यास १४५ हा सत्तास्थापनेचा जादुई आकडा महाविकास आघाडी सहज गाठेल. तर दुसरीकडे महायुतीकडे असणाऱ्या १७ जागांनुसार त्यांच्याकडे १२५ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्राबल्य आहे.
दोन्ही आघाड्यांमधलं अंतर ३३ विधानसभा मतदारसंघांचं आहे. त्यातल्या ३१ मतदारसंघांमध्ये अवघ्या पाच हजार मतांनी विजय किंवा पराभव घडून आले आहेत. त्यात मुंबईतील अंधेरी पश्चिम व मालाड पश्चिम ते पालघरमधील डहाणू आणि बीडमधील माजलगाव अशा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या काठावरच्या मतदारसंघांमध्ये निकाल कोणत्याही बाजूने लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे ३१ मतदारसंघही दोन्ही बाजूंना जवळपास समसमान आहेत. त्यातील १६ मतदारसंघांमध्ये मविआ तर १५ मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीवर आहे. अर्थात, १६ मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला असला, तरी मविआचे उमेदवार पाच हजारांहून कमी मतांनी पिछाडीवर होते. तर दुसरीकडे १५ मतदारसंघांमध्ये मविआचा विजय झाला असला, तरी महायुतीचे उमेदवार पाच हजारहून कमी मतांनी पिछाडीवर होतेमहायुती आघाडीवर असणारे काही मतदारसंघ…
महायुती आघाडीवर असणारे काही मतदारसंघ…
नेवासा, मावळ, महाड, कराड दक्षिण, शिरोळ, सांगोला, अहमदपूर, उदगीर, मालेगाव, भोकर, पुसद, धुळे शहर, पुणे कँटोनमेंट
मविआ आघाडीवर असणारे काही मतदारसंघ
डहाणू, पाटण, मुखेड, देगलूर, नायगाव, हदगाव, रामटेक, भोकरदन, कराड उत्तर
तसं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीतील मतदान व विधानसभा निवडणुकीतील मतदान यामध्ये बराच फरक असू शकतो. पण या मतदानातून राज्याच्या राजकीय मतविभागणीचा साधारण अंदाज येणं शक्य आहे.
३१ मतदारसंघांची पक्षनिहाय आकडेवारी काय सांगते?
काठावरच्या ३१ मतदारसंघांचं पक्षनिहाय गणित पाहिल्यास भाजपा ९ ठिकाणी आघाडीवर तर ११ ठिकाणी पिछाडीवर आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) ५ ठिकाणी आघाडीवर तर ५ ठिकाणी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) एका ठिकाणी आघाडीवर आहे. दुसरीकडे मविआमध्ये काँग्रेस ८ ठिकाणी आघाडीवर असून ६ ठिकाणी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) २ ठिकाणी आघाडीवर तर २ ठिकाणी पिछाडीवर आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) ६ ठिकाणी आघाडीवर तर ६ ठिकाणी पिछाडीवर आहेद रम्यान, लोकसभा निवडणूक निकालांनुसार महायुती १२५ जागांवर तर मविआ १५८ जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यानुसार…