अँड. पप्पू मोरवाल यांना पितृशोक ! श्रीराम मोरवाल यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा

0
अँड. पप्पू मोरवाल यांना पितृशोक ! श्रीराम मोरवाल यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा

अकोला दिव्य ऑनलाईन : कुमावत क्षेत्रीय समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि जुन्या काळातील प्रसिद्ध विट उत्पादक आणि ख्यातनाम विधिज्ञ अँड.पप्पू मोरवाल यांचे वडील श्रीराम तुलशीराम मोरवाल यांचे अल्पशा आजाराने आज बुधवार दिनांक २ ऑक्टोबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले बबलू आणि अँड.पप्पू मोरवाल, मुलगी वैशाली आणि भाऊ राधेश्याम, इंद्रसिंग आणि देविसिंग मोरवाल तसेच सुना, नात नातवंडांसह मोठे आप्त कुटुंब आहे. हसतमुख, मनमिळावू स्वभाव आणि सचोटीचा व्यवहार व लाघवी स्वभावामुळे जुने शहरासह सर्वदूर परिचित होते.

त्यांची अंतिम यात्रा उद्या गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी जुने शहरातील अगरवेस दगडी पुल येथील त्यांच्या निवासस्थानावरुन सकाळी ९ वाजता निघणार असून, गडंकी रोडवरील गुलजार पुरा येथील स्मशान भुमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here