विदेशात ही ओळख !डिस्ट्रीक्ट ३२३४ एच२चे सर्वोच्च मेडल देऊन सुभाष चांडक सन्मानित

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : लॉयन्स इंटरनॅशनल अंतर्गत विदर्भ, मराठवाडा, खान्देश मधील १०४ क्लबचा समावेश असलेल्या लॉयन्स प्रांत ३२३४ एच २ चे प्रांतपाल राहुल औसेकर यांनी लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनला कार्यालयीन भेट देऊन कार्यान्वित प्रकल्पाची पाहणी केली.तसेच आतापर्यंत कोण कोणते प्रकल्प पूर्ण झाले याची माहिती घेतली आणि पुढील प्रकल्पासाठी चर्चा केली. व्यासपीठावर मुख्य अतिथी राहुल औसेकर, क्लबचे अध्यक्ष अमित अग्रवाल, सचिव प्रदीप मानकर, कोषाध्यक्ष संजय राउत विराजमान होते. कार्यक्रमात माजी प्रांतपाल रमाकांत खेतान, अश्विनकुमार बाजोरिया, कॅबिनेट ऑफिसर संजीव गुप्ता, झोन चेअर पर्सन डॉ. मनोज अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती.

    लॉयन्स ऑफ अकोला मीडटाउनच्या हार्ट सर्जरी कॅम्प व दरवर्षी विदेशात जाऊन क्लबचा पदग्रहण सोहळा यामुळे क्लबची ओळख अनेक देशात आहे. असे त्यांनी आवर्जून सांगून क्लबच्या पदाधिका-यांना अवार्ड देऊन सन्मानित केले. ज्यामध्ये डिस्ट्रीक्ट कॅबिनेट ऑफिसर व क्लबचे प्रशासक सुभाष चांडक यांनी ५० देशात जाऊन लॉयन्स इंटरनॅशनल मिट घेऊन डिस्ट्रीक्ट ३२३४ एच २ ची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांना डिस्ट्रीक्ट ३२३४ एच२चे सर्वोच्च मेडल देऊन सन्मानित केले.

    या अगोदर सुद्धा सुभाष चांडक यांना २५० च्या वर अवार्ड मिळाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन द्वारा राज्यपाल यांच्या हस्ते, चिफ मिनिस्टर, स्टेट बँक ऑफ इंडिया, माहेश्वरी समाज ट्रस्ट अकोला आर. सी. एफ. फर्टीलाझर कंपनी मुंबई, नारायण सेवा समिती उदयपुर, इंडियन असोसीएशन बँकाक, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारत भूषण अवार्ड आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्ली, तसेच भारतातील अनेक सामाजिक संस्था विदेशातील संस्थाच्या द्वारे सन्मानित केले आहे. तसेच एल. सी. आय. एफ. करिता डोनेशन देण्याचे कबूल केल्या बद्दल प्रकाश आनंदानी, प्रमोद चांडक, संजय अग्रवाल, राहूल सावजी, डॉ. मनोज अग्रवाल, प्रशांत फुलारी, सुनील जेसवानी, प्रकाश आलिमचंदानी ह्यांनी त्यांना डिस्ट्रीक्टची विशेष पिन व सर्टिफिकेट देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमा मध्ये संतोष वाधवानी, निर्मल आईदासानी, महेश मनवानी, दयाराम रोहडा, प्रताप आहुजा, राजेश डाहे, विजय गोडा, घनश्याम जोशी, जयराम मोटवानी, परेशसिंह सलुजा ह्यांची उपस्थिती लाभली. मंच संचालन प्रशांत फुलारी आभार प्रदर्शन संजय राउत यांनी केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!