पाम जीवनशैली’ (The Palm Lifestyle) म्हणजे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आणि ते सहज आहे. तर पाम जीवनशैली हा अकोलेकरांच्या आवडीनिवडीचा मान ठेवून सुरू करण्यात आलेला एक अत्यंत आधुनिक आणि आगळावेगळा व्यावसायिक उपक्रम आहे. यामध्ये खवैय्यांसाठी खास ‘पँट्री सुपरमार्केट‘ ज्यामध्ये सगळ्याच प्रकारचे ड्रायफ्रुट, शेकडो चवीचे चॉकलेट्स, विविध चवीचे शितपेय आणि बरेच काही • फॅशनेबल पोशाखाचा पहिला मजला म्हणजेच लहान मुले, मुली आणि महिलांसाठी पेहरावाचे दालनात साड्या व लेहेंगा, पारंपरिक व पार्टी वेअर, वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअर, लाउंज आणि नाईट वेअर, कस्टमाइज्ड स्टिचिंग फॅशनेबल पोशाख,व सौंदर्यप्रेमींसाठी ‘मेराकी कॉस्मेटिक्स आणि गिफ्ट्स’चा अप्रतिम संग्रह एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : आज देशातील मोठ्या शहरांमध्ये मिळणारी खरेदीची आधुनिक सुविधा अकोल्यासारख्या शहरात तब्बल ३२ वर्षांपूर्वी ‘विदर्भ सुपर बाजार’च्या माध्यमातून स्व. सुरेश मणियार यांनी प्रत्यक्षात आणली. ‘आपल्या मुलांनी आणि सुनांनी नवनवीन आणि वेगळ्या विचारांनी शहरात नवनवीन व्यवसाय सुरू केले पाहिजेत,’ हा स्व. सुरेशजींचा वारसा आणि प्रोत्साहन पुढे नेत मणियार परिवाराने अकोलेकरांसाठी आता एक नवे पर्व सुरू केले आहे. सुपर बाजार आणि हँडलूमचा समृद्ध वारसा असलेल्या प्रसिद्ध ‘विदर्भ ग्रुप’चा हा नवा डिजिटल आणि आधुनिक अवतार म्हणजेच ‘द पाम लाईफस्टाईल’ हा उपक्रम होय.
सौंदर्यप्रसाधने
भेटवस्तू
मुलांचे कपडे
पुरुषांसाठी आवश्यक फॅशन ॲक्सेसरीज
साड्या आणि लेहेंगा, पारंपरिक आणि पार्टी वेअर, वेस्टर्न आणि कॅज्युअल वेअर, लाउंज आणि नाईट वेअर, कस्टमाइज्ड स्टिचिंग

अकोलेकरांचे अथांग प्रेम, विश्वास आणि पाठिंब्याच्या बळावर पंकज मणियार, अमित मणियार या भावंडांनी आणि लीना व पूनम मणियार या जेठाणी-दिराणीच्या जोडीने या नव्या पर्वाची सूत्रे हाती घेतली आहेत. या नव्या उपक्रमाचा भव्य दोन दिवसीय उद्घाटन सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर व सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सोमाणी हॉस्पिटलजवळ, जनता बँकेच्या बाजूला, जठारपेठ, अकोला येथे सकाळी १० वाजल्यापासून हा सोहळा सुरू होईल.
या मंगलप्रसंगी श्रीमती चंदा सुरेशजी मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज व लीना मणियार, अमित व पूनम मणियार, तसेच भूमी, अमन, रुद्राक्ष आणि आकाश मणियार हे संपूर्ण मणियार कुटुंब अकोलेकरांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात सर्व अकोलेकरांनी अभिमान, कृतज्ञता आणि आपुलकीने सहभागी व्हावे, असे हार्दिक आमंत्रण मणियार परिवाराकडून करण्यात आले आहे.