अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : कायदाचा वचक इतिहास जमा झाल्याने दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून, चक्क बॅकेच्या लॉकरची बनावट (डुप्लिकेट) चावी तयार त्या चावीच्या मदतीने लॉकर मधील सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सफाई एका कर्मचारीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र एका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांला मुळिचावी कशी मिळाली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

अकोला शहरातील राधा किसन प्लॉट येथील अग्रसेन भवन समोरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील बँकेच्या अंतर्गत कामकाजाचे लेखापरीक्षण करताना डिमांड लोनशी संबंधित व्यवहारात अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. तसेच बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्येही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणात एक कोटी ७ लाख २५ हजार ६६० रुपये किमतीचे सुमारे ७१५.०४४ ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची अफरातफर झाल्याचे दिसून आले. तेव्हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख पंकजकुमार कमलाप्रसाद श्रीवास्तव (५२) यांनी पोलिसांत तक्रार दिली.
तक्रार दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली. कंत्राटी सफाई कर्मचारी वैभव धनराज कोल्हेवर लक्ष केंद्रित केले. विचारपुस करताना पोलिसांना विसंगती लक्षात आल्याने वैभव कोल्हे विरुद्ध गुन्हा दाखल केला. कंत्राटी तत्वावर सफाई कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार श्रीवास्तव यांना आहेत. त्यांनी या शाखेत अकोला जवळील बोरगाव खुर्द येथील रहिवासी वैभव कोल्हे याची सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती केली होती.
बँकेचे क्षेत्रीय प्रमुख पंकजकुमार श्रीवास्तव यांच्या तक्रारीनुसार लॉकरमधून सुमारे ७१५.०४४ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत १ कोटी ७ लाख २५ हजार ६६० रुपये आहे. आरोपीने बँकेच्या लॉकरची बनावट (डुप्लिकेट) चावी तयार केली होती. त्या चावीच्या मदतीने त्याने दागिने चोरले आणि ते दागिने दुसऱ्या एका फायनान्स बँकेत गहाण ठेवून वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळवले.आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. गहाण ठेवलेले सोने परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणात बँकेतील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
