अकोला दिव्य न्यूज : माणुसकी आणि रक्ताच्या नात्याला कलंकित करण्याचा घटनेतील आरोपी विजय छगन दवंडे याला विविध कलमान्वये कारावास आणि रोख रकमेचा दंड मिळून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व विशेष न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी ठोठावली आहे.या प्रकरणात संपूर्ण युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.

थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी विजय छगन दवंडे याने अकोट शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की, त्याची अल्पवयीन मुलगी कोणालाही न सांगता घरुन निघुन गेली.तीला अज्ञात इसमाने पळवुन नेले असावे.या तक्रारवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान पिडीताने आईसह पोलीस स्टेशनला जवाब नोंदविला असता, फिर्यादी हा तिचा सावत्र वडील असुन त्याने घरात वारंवार विनयभंग केला.अकोला येथे शितपेयात दारु पाजुन जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचे सांगितले. या जबाबावरून अकोट शहर पोलीसांनी कलम ३६३,३५४,३७६ (२) (एफ), ५०६ सहकलम ५ (एन) (पी), ६ पोक्सो कायद्याप्रमाणे आरोपी विजय छगन दवंडेवर (वय ४१) अकोट शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात २१ जानेवारी २०२२ पासून अकोला कारागृहात मध्ये बंदिस्त आहे.

न्यायलयाने या प्रकरणात ३ वर्ष कठोर कारावासाची शिक्षा, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना अतिरीक्त सश्रम कारावासची शिक्षा, तसेच भादवीचे कलम ५०६ प्रमाणे १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची अतिरीक्त सश्रम कारावासची शिक्षा. भादवीचे कलम ३७६ (२) (एफ) व ३७६ (३) तसेच पॉक्सो कायदयाचे कलम ५ (एन) पी.यु.एस ६, ५ (पी) पी.यु.एस ६ प्रमाणे आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ५० हजार रूपये दंडासह ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तसेच दंडाची रक्कम ६५ हजार रुपये आरोपीने भरल्यास पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी.असे आदेशामध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणात अकोट शहर पोलीस स्टेशनचे यांनी तपास करून दोषारोपपत्र पो.उप.नि. राजेश जावरे यांनी न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात एकूण १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. वैद्य कीय अधिकारी व तपास अधिकारी या साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्यात. या प्रकरणात संपूर्ण युक्तीवाद सरकारी वकील अॅड. अजित देशमुख यांनी केला व पोलीस अधिक्षक अकोला अर्चित चांडक अकोट पो. उपविभागीय अधिकारी निखील पाटील तसेच अकोट शहर पो.स्टे. वे ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनात कोर्टपैरवी म्हणून अकोट शहर पोलीस स्टेशनचे ए.एस.आय. प्रकाश जोशी व पो.कॉ. आश्विन नवघरे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. तसेच सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी न्यायालयात युक्तीवाद केला की, या प्रकरणात सावत्र मुलीवर आरोपीने लैगिंक अत्याचार केला आहे आणि त्याने वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासल्याने या अशा आरोपीला दया दाखविल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जावु शकतो तेव्हा आरोपीला कुठल्याही प्रकारची दया न दाखवता त्याने केलेल्या या गंभीर अपराधा बद्दल त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपी विजय दवंडे आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
