अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे शाळा व महाविद्यालयाचा विकास आहे. शिक्षणातून घडणारा विद्यार्थीच पुढे देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्वतःचा, संस्थेचा व पर्यायाने देशाचा विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असं प्रतिपादन प्रा.प्रकाश डवले यांनी केले.
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात डवले पब्लिक स्कूल आणि कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रवींद्र चौधरी व ख्यातनाम डॉ. वनश्री डोईफोडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश डवले, सचिव मृणालिनी डवले तसेच वैशाली निवाने आणि प्रज्ञा इचे यांची उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ‘व्यसनापासून दूर राहून आपल्या आयुष्याला योग्य दिशा द्या आणि उज्ज्वल भविष्याची जडणघडण करा, असा संदेश दिला. डॉ. वनश्री डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा, मोबाईलपासून योग्य अंतर ठेवावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. शिक्षण, आरोग्य आणि सकारात्मक विचार यांना जीवनात महत्त्व देण्याचा संदेश त्यांनी दिला.

संस्थेचे अध्यक्ष प्रकाश डवले यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांचा विकास म्हणजे शाळा व महाविद्यालयाचा विकास आहे. शिक्षणातून घडणारा विद्यार्थीच पुढे देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून स्वतःचा, संस्थेचा व पर्यायाने देशाचा विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास सौ. प्राची घिनमिने, सौ. कविता बलिंगे, सौ. श्वेता तायडे, कु. दीपाली चिकटे, सौ. स्वाती बोरोडे, वररुची खेडकर, सौ. श्रद्धा देशपांडे, सौ. इतका दुबे, सौ. रजनी पांडे, कु. पारिजात पुनसे, सागर लोखंडे, श्याम सुलताने, किशोर स्वर्गे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन सौ. श्रद्धा देशपांडे तसेच सौ. कविता बलिंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार कु. दीपाली चिकटे यांनी मानले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, संविधानिक मूल्ये, व्यसनमुक्त जीवनशैली, आरोग्याची जपणूक, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.