शिष्यवृत्ती परीक्षेत सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बिर्ला रोड, अकोला येथील सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत यशस्वी ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत – अंश संजय ढोले, अथर्व संतोष पस्तापुरे, हर्षाली सचिन समुद्रे, अदिती सुनील पारधी, गुंजन सुभाष मंजूरकर, आराध्या रूपेश बहुराशी, प्रथमेश विनोद चव्हाण, यश गणेश मोरे, स्वरा धनंजय मुरुमकार, आराध्या प्रदीप सागर, गायत्री चंदन चारोडे, शिवानी दिनेश भालेराव, सुजितकुमार सत्यशील शिरसाट आणि अनुष्का पवन जुनारे.
या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्रता मिळवली.

शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच भविष्यातील एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पाया घालणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, अभ्यासाची सवय आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून या परीक्षेसाठी प्रोत्साहित केले जाते.या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक तसेच प्राचार्या मनीषा राजपूत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here