सुभाष चांडक यांची लॉयन्स इन्टरनॅशनल अधिवेशनच्या चेअरमनपदी नियुक्ती

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असल्याचा मान प्राप्त झालेली संस्था लॉंयन्स इन्टरनॅशनल अंतर्गत डिस्ट्रीक्ट 3234 एच 2 चा डिस्ट्रीक्ट शपथविधी सोहळा संभाजी नगर येथे नुकताच पार पडला. ज्यामध्ये पुढील वर्षी अमेरीका येथे होणा-या इन्टरनॅशनल कन्व्हेशन व मीट या अत्यंत प्रतिष्ठीत व महत्वाचा अधिवेशनाचे डिस्ट्रीक्ट चेअरमनपदाची जबाबदारी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राहूल औसेकर यांनी सुभाष चांडक यांना दिली. कार्यक्रमामध्ये विदर्भ मराठवाडा खान्देश मधील 97 क्लब व 800 पदाधिका-यानी भाग घेतला होता. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राहूल औसेकर इन्टॉलीग ऑफीसर पास्ट इन्टरनॅशनल प्रेसिडेन्ट ए. पी. सीग, पास्ट इन्टरनॅशनल डायरेक्टर डॉ. नवल मालू, आय.पी.डी.जी अश्विनकुमार बाजोरीया व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर योगेश जयस्वाल, सुप्रीया कोतवाल, उपस्थित होते. शपथविधी अधिकारी ए.पी. सिंग ह्यांनी डिस्ट्रीक्टच्या पदाधिका-याना आप आपल्या पदाची जबाबदारी बद्दल माहिती देऊन शपथ दिली.

पुढील वर्षी अमेरीका येथे होणा-या अधिवेशनात 50 ते 100 पदाधिका-यां घेऊन जाण्याचा मानस चांडक यांनी व्यक्त केला, या अगोदर चांडक यांनी अनेक देशात अधिवेशनात सहभागी होऊन तसेच अनेक देशात इन्टनॅशनल मीटचे सफल आयोजन केले आहे. ज्यामध्ये अमेरीका, लंडन, इटली, फ्रॉन्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँन्ड, इस्त्राईल, श्रीलंका, मालदीव, भुटान, चायना, नेपाल, मलेशिया, बेल्जीयम, इजिप्त, हॉलंड, हॉंगकॉंग, जर्मनी, ऑस्ट्रीया, दुबई, सिंगापूर, फुकेट, थॉयलन्ड, मॉरीशियस, स्विजरलॅन्ड, बँकाक इत्यादी 50 देशामध्ये मीट घेऊन डिस्ट्रीक्ट 3234 एच 2 ची आगळी वेगळी ओळख निर्माण केली.

सुभाष चांडक यांनी आज पर्यंत 8100 लाभ मिळवून दिला आहे कार्यक्रमामध्ये पीडीजी रमाकांत खेतान डॉ. अशोक बावस्कार, प्रेमदादा रायसोनी, गिरीश सिसोदीया, एच.एन.जैन, लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाउनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अमीत अग्रवाल तसेच प्रमोद मानकर, संजय राऊत, सचिव प्रशांत फुलारी, नरेश चोपडा, तेजस झांबड यांची उपस्थिती होती. पदाधिका-यांनी सुभाष चांडक यांचे अभिनंदन करून पुढील वर्षी अधिवेशनात येण्याचा मानस व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here