• उद्योगपती, स्टार्टअप्स अन् व्यावसायिकांसाठी उपक्रम • •अकोला दिव्य न्यूज : जागतिक एमएसएमई दिनानिमित्ताने इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अकोला शाखेकडून महाराष्ट्र बॅंक आणि बँक ऑफ इंडिया व टॅली यांच्या सहकार्याने 22 व 23 जून असे 2 दिवस ‘एमएसएमई महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले असून एमएसएमई उद्योजक, स्टार्टअप्स, सरकारी विभाग आणि व्यावसायिक या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

स्थानिक तोष्णीवाल लेआऊट येथील आयसीएआय भवन येथे आयोजित या महोत्सवात उद्योजक अंकुश भरतिया यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. या सत्रात सीए अर्पित काबरा “सीसीएम आटोमॅशन फॉर एमएसएमई” या विषयावर मार्गदर्शन करणार असून तंत्रज्ञानाद्वारे व्यवसायाची कार्यक्षमता, उत्पादकता आणि वाढ कशी वाढवता येईल यावर प्रकाश टाकतील. तसेच सीए सचिन तुलशान महाराष्ट्र इंडट्रीज इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेस पॉलिसी तथा पर्यटन पॉलिसी 2024′ वर व राज्य सरकारची नवीन नीती, उपलब्ध प्रोत्साहन, सवलत व गुंतवणूक यांची माहिती देतील तर सीए पंकज अग्रवाल कोल्ड स्टोरेज प्रोजेक्ट, बायमॉस पेलेटसाठी एमएनआरई अनुदान तथा दाल मिल सबसिडी’ विषयावर प्रकल्प स्थापना, व्यवहार्यता व उपलब्ध शासकीय अनुदान संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘सपोर्टिंग्ज स्मॉल बिझनेस, बिग ईग्पॅक्ट’ या 5 संकल्पनेवर आधारित हा महोत्सव उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला नव्या गतीने पुढे नेण्यास महत्त्वाचा वाटा उचलेल.
या दोन दिवसीय महोत्सवात एमएसएमई सुविधा आणि हेल्प डेस्क, विविध सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांचे उद्योजक समस्यांवर निराकरण व मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा उद्योग केंद्र, राज्य जीएसटी विभाग, पीएमएफएमसी योजना, आयकर विभाग, महापालिका, कृषी विद्यापीठ, ईएसआयसी तसेच ईपीएफओ यासारख्या विभागांचे अधिकारी प्रथमच एकाच व्यासपीठावर सहभागी होणार आहेत. 23 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एमएसएमई, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी पूर्ण दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले
असोसिएशनचे अध्यक्ष सीए रोमिल सोजातिया यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या उपक्रमासाठी गठीत आयोजन समितीत सीए प्रतीक मंत्री, उपाध्यक्ष सीए विशालकुमार राजपाल, सचिव सीए श्याम माहेश्वरी, कोषाध्यक्ष तसेच सीए धीरज चांडक, आयपीसी व विकासाध्यक्ष सक्रिय भूमिका बजावत आहेत. सर्व सदस्य, उद्योजक, एमएसएमई ग्राहक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
