Friday, June 12, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात खळबळ : सुप्रसिद्ध शेगांव कचोरी सेंटरवर एफडीआयची धाड !

अकोल्यात खळबळ : सुप्रसिद्ध शेगांव कचोरी सेंटरवर एफडीआयची धाड !

अकोला दिव्य न्यूज : संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शेगाव हे धार्मिक क्षेत्रात पश्चिम विदर्भातील पंढरपूर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि यासोबतच शेगावची कचोरी देखील ! अशा ख्यातनाम शेगावातील प्रसिद्ध कचोरी सेंटरला भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहीमेतील कारवाईची झळ बसली आहे.बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शेगावच्या एका नामांकित कचोरी सेंटरवर छापा टाकून कचोरी निर्मितीस वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

अकोला दिव्य ग्राफिक्स

शेगावची कचोरी ही राज्यासह देशभरात प्रसिद्ध असून, दरवर्षी येथे दर्शनासाठी येणारे लाखो भाविक कचोरीचा आस्वाद घेतात. त्यामुळे या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत प्रशासन विशेष सतर्क असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे वृत्त शेगाव कचोरी नावाने कचोरी तयार करून विक्री करणाऱ्यांना माहिती होताच शेगावसह बुलडाणा व अकोला शहर व जिल्ह्यातील कचोरी विक्रीचे केंद्राला कुलुप लावुन धुम ठोकली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, या कारवाईची झळ आता शेगावच्या कचोरी सेंटरलाही बसली असल्याने एकच खळबळ माजली आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित कचोरी सेंटरवर अचानक धाड टाकली. राज्यात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर प्रशासनाचा करडा नजर असल्याचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

Oplus_131072

कचोरीसाठी लागणाऱ्या साहित्याची तपासणी. : कचोरी तयार करण्यासाठी वापरले जाणारे पीठ, मसाले, तेल तसेच इतर कच्च्या मालाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.

भेसळ आढळल्यास होणार कारवाई. : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा अथवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!