अकोला दिव्य न्यूज : अमेरिकेनं इराण विरुद्ध सुरू पुकारताच त्यांच्या नौदलाच्या युद्धनौकेवर हल्ला केला होता. हिंदी महासागरात अमेरिकेनं इराणी युद्धनौका IRIS डेनाला जलसमाधी दिली. विशेष म्हणजे ही युद्धनौका भारताच्या बंदरातून युद्ध सराव आटपून निघाली होती. अमेरिकेनं भारतापासून हाकेच्या अंतरावर इराणी युद्धनौका बुडवली. आता परिस्थिती त्याहून गंभीर बनली आहे. अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीयांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्यांपासून जवळ गेल्या तीन दिवसांत अमेरिकेनं दोन जहाजांवर हल्ले केले. या जहाजांवरील कर्मचारी भारतीय होते. त्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातील संबंध आणि क्वॉड सहकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अमेरिकन नौदलानं बुधवारी २४ भारतीय कर्मचारी असलेल्या सेटेबेलो नावाच्या तेल टँकरवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ वर्षीय खलाशी आदित्य शर्माचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर भारतानं अमेरिकेच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला. फॉरवर्ड सिमेन्स यूनियन ऑफ इंडियाचे (FSUI) सचिव मनोज यादव यांनी अमेरिकेचे दावे खोडून काढले आहेत. मॅरिवॅक्स आणि सेटेबेलो जहाजांवरील कर्मचाऱ्यांनी सूचनांचं पालन केलं नव्हतं, असा दावा अमेरिकेनं केला होता. हा दावा खोटा असल्याचं यादव म्हणाले. कर्मचाऱ्यांना रेडिओवरुन कोणतीही सूचना किंवा इशारा देण्यात आलेला नसल्याचं यादव म्हणाले.”सेटेबेलो हल्ल्यानंतर २१ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आलं. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मॅरिवॅक्स जहाजावर हल्ला झाल्यानंतर दोनच दिवसांनी सेटेबेलोवर हल्ला झाला आहे. मॅरिवॅक्सवरील सर्वच्या सर्व २४ भारतीय कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.
अमेरिकेनं तीन दिवसांत दोनदा भारतीयांना थेट लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे भारतीय खुलाशांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेनं साधा खेदही व्यक्त केलेला नाही. अमेरिकन नौदलानं दु:ख व्यक्त करण्याऐवजी आपली कृती योग्यच असल्याचं ठामपणे म्हटलं आहे. त्यामुळे हिंदी महासागर आणि आसपासच्या परिसरातील क्वॉड सहकार्य, भारत-अमेरिकेतली करारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी पी. हरिश यांनी व्यावसायिक जहाजांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीयांचा जीव गेला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प व्यावसायिक जहाजांवरील अमेरिकेच्या हल्ल्यांबद्दल अभिमानानं बोलत आहेत. या हल्ल्यांकडे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन सैन्याचं यश म्हणून पाहात आहेत,’ अशा शब्दांत हरीश यांनी तीव्र नाराजी
