अकोला दिव्य न्यूज : बदलत्या काळात शेती सोबतच दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मत्स्यपालन, कृषी प्रक्रिया उद्योग यासारख्या शेती पुरक व्यवसायाकडे युवा शेतकऱ्यांनी वळण्याची गरज असून, अशा उपक्रमासाठी अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सेवा सहकारी सोसायटीचे भक्कम पाठबळ उपलब्ध आहे. असे प्रतिपादन अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी केले.
दहिहांडा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ.कोरपे म्हणाले की, दहिहांडा सेवा सहकारी सोसायटीची स्थापना १९५९ ला झाली. त्या कठीण काळात देखील संस्थेचे सर्व सभासद सोसायटीच्या प्रगतीसाठी सहभागी व्हायचे. त्यांनी पेरलेल्या रोपट्याची फळे आज आपण सर्वांना मिळत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात सेवा सहकारी सोसायट्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगीतले.

ही व्यवस्था अधिक भक्कम करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल व्यवहार, पारदर्शक कारभार आणि शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा यामुळे सोसायट्यांची विश्वासार्हता अधिक वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सेवा सहकारी सोसायट्यांनी पारंपारीक कामकाजाच्या चौकटी बाहेर जावून आधुनिक उपक्रम हाती घ्यावे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणेसाठी व शेतकऱ्यांना अधिकाअधिक सुविधा उपलब्ध करून देणेसाठी सहकार क्षेत्राने नवा आयाम स्विकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी दहिहांडा सोसायटी च्या संचालक मंडळाच्या वतीने बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
PRO/539
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती निळकंठ खेडकर, दहिहांडा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अ.मुतलीब अ.गफुर, भिमराव कोलटक्के, डिगांबर कासमपुरे, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक अजय आठवले, सुनिल गायगोळ, अ.जावेद अ. हमीद, रूपराव डहाके, राजेंद्र गासे आशिष मगर, निरंजन पळसपगार व गावातील प्रतिष्ठीत अजिमोद्दीन मुनिरोद्दीन, शेख आलम शेख वजीर, रवींद्र दाळु, श्रीकृष्ण भांडे पद्माकर फाटे, संजय नवलकार, किशोर फाटे, अरूण चहऱ्हाटे, दादाराव चांदुरकर, गोवर्धन जौंजाळ, नागसेन आठवले, सुधिर पळसपगार, बच्चु मिश्रा, नशीर पटेल, शेख अस्पाक शेख चाँद, पुर्णाजी कोलटक्के, ज्ञानदेव कोलटक्के, सदानंद भोंडे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, सभासद शेतकरी आणि खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक बँकेचे उपमुख्याधिकारी रविंद्र थोरात यांनी केले व सुत्र संचालन दिलीप भुईभार तर आभार प्रदर्शन म.इद्रीस अ.मुतलीब यांनी केले.
दहिहांडा सेवा सहकारी सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन करतांना बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज सं. कोरपे व इतर मान्यवर उपस्थित होते.
