Monday, May 18, 2026
No menu items!
No menu items!
Home'नीट' अकोला कनेक्शन.. ?ज्युनिअर कॉलेज-कोचिंग क्लासचे लागेबांधे तोडा

‘नीट’ अकोला कनेक्शन.. ?ज्युनिअर कॉलेज-कोचिंग क्लासचे लागेबांधे तोडा

अकोला दिव्य न्यूज : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख संशयित पी.व्ही. कुलकर्णी उर्फ प्रल्हाद कुलकर्णी हे लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रातील, विशेषतः लातूर पॅटर्नसाठी अत्यंत प्रसिद्ध मोटेगावकर सरांच्या RCC इन्स्टिट्यूट मध्ये काही काळ सेवारत होते.अकोला शहरासह महाराष्ट्रभर शाखा असलेल्या RCC कोचिंग क्लासच्या लातूर येथील मुख्यालयावर शनिवारी 32 जणांचा समावेश असलेल्या CBI च्या चमुने छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याने अकोला शहराचे तर पेपरफुटीसोबत कनेक्शन नाही ना ? एकंदरीत परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून विद्यार्थी व पालकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून पेपर फुटीचे लातूर कनेक्शन समोर येत असल्याने नीट’, ‘जेईई’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यास आता ज्युनिअर कॉलेज- कोचिंग क्लास यांचे वाढते लागेबांधे, इंटिग्रेटेड कल्चर तोडण्याची गरज असल्याचा नवीन मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे’ पुणे’ यंदा पेपर फुटीचे मुख्य केंद्र निघाले असून ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात शिक्षक पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना सीबीआयने अटक केल्यानंतर, राज्यातील अनेक शहरापर्यंत ही साखळी आल्याची पोलिसांना माहिती मिळत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.अलिकडच्या काही वर्षांत खाजगी कोचिंग क्लासेसचे पेव फुटले असून, यामुळे कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला की, कॉलेजमध्ये हजर राहण्याची गरजच नाही. कॉलेज प्रशासन व क्लासच्या प्रशासनाचे लागेबांधे असल्याने. विद्यार्थी कॉलेजऐवजी क्लासला उपस्थित असतात. पेपर फुटीचा प्रकरणात या अनुषंगाने देखील संबंधितांची चौकशी सुरू असल्याने ‘लातूर कनेक्शन’ला महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्पर्धेच्या काळात सर्व काही पैशांनी विकत घेता येते, अशी प्रवृत्ती वाढत आहे. गुणांसाठी विद्यार्थी किंवा प्रसिद्धी व आर्थिक फायद्यासाठी काही वर्गचालक अनैतिक मार्गांचा अवलंब करीत आहेत.यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसतो, परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली असून पैशाचा व सत्तेचा प्रभावही स्पष्टपणे जाणवतो. तेव्हा कोचिंग संस्था आणि शैक्षणिक संस्थांशी आरोपींचे असलेले संबंध ‘सीबीआय’ने तपासावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.

नीट परीक्षेबाबत यापूर्वीही शंका उपस्थित होऊनही सुरक्षित व न्याय्य पद्धती उभारण्यात अपयश आले. या प्रकरणाचे धागेदोरे सापडणे गंभीर असून, शिक्षक, कॉलेज, संस्था, क्लास यांची सखोल चौकशी होऊन, कारवाई करणे आवश्यक आहे,’ असे मत व्यक्त करताना अकोला शहरातील बहुतांश पालकांनी ज्युनिअर कॉलेज- कोचिंग क्लास यांचे लागेबांधे तातडीने तोडण्याची मागणी केली आहे.

या शिक्षकांनी काम केलेल्या कॉलेज आणि संस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आह. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी पी. व्ही. कुलकर्णी यांनी काम केलेल्या दयानंद सायन्स कॉलेज; तसेच मनीषा मांढरे काम करीत असलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स, कॉमर्सच्या प्रशासनाची चौकशी होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!