Monday, May 18, 2026
No menu items!
No menu items!
Homeकोचिंग क्लासवाल्यांचे धाबे दणाणले ! RCC चे मोटेगावकर ताब्यात

कोचिंग क्लासवाल्यांचे धाबे दणाणले ! RCC चे मोटेगावकर ताब्यात

अकोला दिव्य न्यूज : एकेकाळी सायकलवरून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवणारा शिक्षक आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोचिंग ब्रँडचा मालक असलेल्या लातूर येथील RCC शिकवणी वर्गाचा प्रमूख शिवराज मोटेगावकरची ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात रविवारी दुपारी २ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. आता आज सोमवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला कायदेशीर ताब्यात घेतले आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

अकोला शहरातील विद्या नगर, निशू नर्सरी जवळ मोठ्या प्रशस्त जागेत मागील काही वर्षांपासून मोटेगावकर सर यांचे RCC कोचिंग क्लासेस सुरू आहे.अलिकडेच मोटेगावकर यांनी अकोल्यात हजारो फुट चौरस स्वमालकीच्या जागेत आपला शिकवणी वर्ग हलविले आहे दरम्यान या काळात विदर्भातील काही कोचिंग क्लासवाले संपर्कात आले काय ? याची सीबीआय चौकशी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेस संचालकांवर संशयाच सावट पसरले आहे.

सौजन्य गुगल

दोन दिवसापूर्वी त्यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयातून अनेक प्रकारचे कागदपत्रे ‘ सीबीआय’ ने जप्त केले होते. मात्र, त्यांना ताब्यात घेतले नव्हते. रविवारी रात्रीही त्यांची चौकशी सुरू होती. नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचे समजल्यानंतर या शिकवणीवर्गातून ४२ प्रश्न ‘नीट’ परीक्षेत आल्याची तक्रार एका पालकाने केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असतानाच ‘सीबीआयचे’ पथक लातूरमध्ये दाखल झाले. त्यांनी मोटेगावकर यांची चौकशी सुरू केली. मात्र, कोणत्या शिकवणी चालकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली हे जाहीर केले नव्हते.

सीबीआयने शिकवणी वर्ग चालकाची चौकशी सुरू केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना शिकवल्याचा दावा मोटेगावकर करत होते. आज सोमवारी सकाळी मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणारा लातूरचा प्रा.पी.व्ही कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आणि मोटेगावकर ही रसायनशास्त्र शिकवत. आरोपी बरोबर मोटेगावकरांचे संबंध कसे याचा शोध सीबआयचे अधिकारी घेत होते.

लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बॅन्ड लावून कौतुक करण्यापासून ते लातूर पॅटर्नचे फॅक्टरीमध्ये रुपांतर करण्याची जाहिरात मोटेगावकर करत. त्यांना ताब्यात घेतल्याने लातूर पॅटर्नच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागणार आहेत. एकट्या लातूरमध्ये किमान ३०–३२ शिवकवणीवर्ग सुरू असून त्याचे लाखो रुपयांचे शुल्क असते. या शिकवणीवर्गात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शिक्षक अध्यापाने काम करत आहेत.


आरसीसी या शिकवणी वर्गात ‘सीबीआय’च्या पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले होते. आज सकाळी पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. नीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आणि मोटेगावकर यांचा पेपरफुटी प्रकरणात कसा संबंध हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. मात्र, पेपरफुटी प्रकरणात नांदेड आणि लातूरमध्ये मोठ्या हालचाली झाल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!