अकोला दिव्य न्यूज : अकोला शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आपलं वेगळेपण जोपासत विद्यार्थ्यांना मुल्यवर्धित शिक्षण आणि क्रीडा, विज्ञान, गणित आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा पाया मजबूत करणा-या हॅपी अवर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश संपादन करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

उदयोनमुख शैक्षणिक संस्थेतर्फे संचालित या शाळेतील ईश्वरी राऊत हिने ९७ टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच समर्थ घाटोळे (९४),श्रेया गावंडे (८७),श्लोक जयदे (८७) ,हर्ष जाधव (८६), सिद्धिका शुक्ला (८६) हर्षदा अमृतकर (८१) आरुषी गडपाल (७७) तसेच प्राची बाधे (७६) यांनी गुणवत्तापूर्ण यश संपादन केले आहे. शाळेचे व्यवस्थापन मंडळ व कर्मचाऱ्यांकडून यशस्वी विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदाचा सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्याचे अभिनंदन ! हे यश म्हणजे रात्री जागून केलेली मेहनत, असंख्य उजळणी आणि अढळ एकाग्रता होय. हॅपी अवर्स स्कूल परिवाराला तुमचा खूप अभिमान वाटत आहे. लक्षात ठेवा, गुण हे केवळ एक घटक आहेत; तुमचे चारित्र्य, जिज्ञासा आणि धैर्य या गोष्टी त्याहूनही अधिक महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जेव्हा नवीन शाखा आणि आव्हानांकडे वाटचाल कराल, तेव्हा हेच समर्पण कायम ठेवा. शिक्षक व व्यवस्थापन तुम्हाला शिक्षण, विकास आणि मोजमाप करण्यायोग्य यशाने भरलेल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतात.अशा शब्दात संस्थेच्या अध्यक्षा ज्योती सेंगर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
