Saturday, May 9, 2026
No menu items!
No menu items!
Homeशेकडो अकोलेकरांनी घेतला BMD तपासणीचा लाभ !अकोला ऑर्थोपॅडिक सोसायटीचा पुढाकार

शेकडो अकोलेकरांनी घेतला BMD तपासणीचा लाभ !अकोला ऑर्थोपॅडिक सोसायटीचा पुढाकार

अकोला दिव्य न्यूज : बदलत्या जीवनशैलीमुळे शरिरातील हाडांच्या मजबुतीसाठी कळत नकळत दुर्लक्ष होऊन, हाडांचे नुकसान होऊ शकते. अलिकडच्या काळात हाडांच्या विकारांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याने हाडांची ठिसूळता तपासणी गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि सामाजिक ऋणानुबंध म्हणून अकोला ऑर्थोपॅडिक सोसायटीकडून आयोजित केलेल्या BMD (Bone Mineral Density) तपासणी शिबिरात शेकडो अकोलेकरांनी आपल्या हाडांची कार्यक्षमता तपासून घेतली.

Oplus_131072

अकोला ऑर्थोपॅडिक सोसायटीकडून महाराष्ट्र ऑर्थोपॅडिक असोसिएशनच्या अधिपत्यात व इंडियन मेडिकल कॉन्सील अकोला शाखा अध्यक्ष डॉ.रणजीत देशमुख व अस्थीव्यंग तज्ज्ञ डॉ. तरुण राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनजवळील आय.एम.ए सभागृहात काल रविवार ३ मे २०२६ रोजी आयोजित शिबिरात BMD (Bone Mineral Density) तंत्रज्ञानाने शेकडो लोकांनी आपल्या हाडाची क्षमता तपासून घेतली. खास नागपूर येथील तज्ज्ञ जगदीश यांनी हाडांची तपासणी केली.

अकोला दिव्य छायाचित्र

हाडांचे आजार असलेल्या रूग्णासोबतच सुदृढ निरोगी व्यक्तींनी देखील हाडांची ढिसूळता तपासून घेतली. विशेष म्हणजे शिबिरात वरिष्ठ व जेष्ठ नागरिक देखील सहभागी झाले होते. या शिबिराचे औपचारिक उद्घाटन मॅरेथॉन स्पर्धेचे विजेते डॉ. तरुण राठी यांच्या हस्ते करण्यात आले.

अकोला दिव्य छायाचित्र

अकोला ऑर्थोपॅडिक सोसायटीचे अध्यक्ष व ऑर्थोपॅडिक तज्ज्ञ डॉ.रजल सिंगी यांनी प्रास्ताविक तर सचिव डॉ अमित राजपाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी डॉ रहेमान खान, माजी अध्यक्ष डॉ.रोहित व्यवहारे, असोसिएशनचे सहसचिव डॉ अजय सुरवाडे, कोषाध्यक्ष डॉ.पियुष सावजी तसेच डॉ.नितीन अग्रवाल, डॉ.अचिन मुरारका, डॉ.अमोल रावणकर, डॉ.निखील बोर्डे, गोविंद छांगानी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!