अकोला महानगर भाजप चिटणीसपदी पंकज राठी यांची नियुक्ती

0

अकोला दिव्य न्यूज : युवा उद्योजक, महाराष्ट्र चेंबर कॉमर्सचे मनोनीत सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इंजि.पंकज सतीष राठी यांची अकोला महानगर भारतीय जनता पक्षाचे चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली.भारतीय जनता पक्षाच्या मूल्याधिष्ठित व विकासाभिमुख विचार प्रणालीवरील पंकज राठी यांचा संपूर्ण विश्वास असल्याने त्यांना चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अकोला महानगर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष, माजी महापौर व भाजपचे जेष्ठ नेते विजय अग्रवाल यांच्या हस्ते, अकोला महानगर अध्यक्ष जयंत मसने,भाजप गोरक्षण मंडळ अध्यक्ष रणजित खेडकर यांच्या उपस्थितीत राठी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यापर्यंत पोहचविण्याची महत्वाची भुमिका सोपविण्यात आली असून राष्ट्रीय एकात्मता व विकासाचे प्रवाहात योगदान तसेच पक्ष संघटनेचा विस्तार व विचार बुथमधील प्रत्येक घरापर्यंत पंकज राठी पोहोचविणार असा विश्वास जेष्ठ नेते विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या ध्येयधोरणाशी बांधिलकी ठेवून, दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करू, पक्ष नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे पंकज राठी यांनी सांगितले. आपल्या निवडीबद्दल खा.अनुप धोत्रे, आ.रणजीत सावरकर, जेष्ठ नेते विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदा खेडकर यांना दिले.भाजप श्रेष्ठींनी राठी यांची निवड करून सामाजिक समीकरण अधिक घट्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here