अकोल्यात संगीतमय ‘बुद्ध पौर्णिमा’ 2 मे रोजी

0

अकोला दिव्य न्यूज : राष्ट्रव्यापी अभिजात कलेचा माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्कार भारती आणि समाजकार्यात सात्विकतेने उल्लेखनीय योगदान देणारी अकोला येथील तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बुद्ध पौर्णिमा’ निमित्ताने बुद्ध व भिमगीत गायनाचा कार्यक्रम प्रमिलाताई ओक हॉल येथे शनिवार 2 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आला आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

तिक्ष्णगत सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे व संस्कार भारतीचे विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष सुधाकर अंबुसकर यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी प्रा. प्रकाश बोरकर यांच्याकडे असून युवा दिग्दर्शक व संगीतकार प्रा. स्वप्निल बोरकर यांच्या संगीत दिग्दर्शनात अकोल्यातील प्रथितयश व नवोदित गायक, गायिका, वादक व गीतकार हा सांगितीक आविष्कार अनुभवणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारतीचे चंदाताई जयस्वाल, डॉ.आर.बी. हेडा, अशोक ढेरे, परळीकर, प्रा.निनाद कुलकर्णी, महेश मोडक तसेच तिक्ष्णगत सोसायटीचे बहुभाऊ मोंडोकार, प्रदीप अवचार तसेच संजय सेंगर, सचिन पाटील परिश्रम घेत आहेत. याबरोबर आशाताई खोकले, वासंती थोते, प्रा. नाना भडके, भाऊलाल देवतवाल, सुधीर बचे, शितल जाट, प्रा.डॉ. रुपा ठाकरे, सुनीता लांजुळकर या समिती सदस्यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत असून प्रा.श्रीकिसन जयस्वाल याचे मागदर्शन लाभत आहे.

समाजात सर्वधर्म समभाव निर्माण व्हावा व भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय थोर महापुरुष, संत यांची शिकवण आणि जीवन मुल्य समाजात रुजवून एकोपा नांदावा ह्या उद्देशातून विविध कार्यक्रमांचे आयोजन या दोन संस्था करतात. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन आयोजन समितीचे वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here