Wednesday, April 29, 2026
No menu items!
No menu items!
Homeमाजी नगरसेवक गोपी ठाकरे यांची मागणी अन् निवेदन

माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांची मागणी अन् निवेदन

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरात उन्हाचे तापमान विक्रमी उच्चांकावर आहे. शहरात काही प्रमाणात तापमान कमी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी व सुविधेकरीता शहरातील रस्त्यांवर पाण्याचा शिंडाकाव करण्याची उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक गोपी ठाकरे यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन महापौर खेळकर आणि आयुक्त लहाने यांना दिले आहे.

संग्रहित छायाचित्र

आज जगातील सर्वाधिक तापमान असलेले शहर म्हणून अकोला शहराची नोंद होत आहे. शहरवासियांना तापमानाचे उच्चांक पहायला मिळत आहेत. मे महिना अजून बाकीच असताना एप्रिल महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठला असून अकोल्याचे तापमान ४६ सेल्सिअसवर कायम आहे.उष्णतेच्या लाटेमुळे शहरवासी होरपळून निघत आहेत. विद्यार्थी, व्यावसायिक, अनेक प्रतिष्ठान व दुकानामधील कर्मचारी, हातमजुरी करणारे या सर्वांना उन्हातही कामानिमित्त ये- जा करावे लागते. यामुळे अनेकांना उष्मघाताचा धोका पत्करावा लागत आहे.

तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. तापमान एवढे प्रचंड आहे की शहरातील उमरी भागात रस्त्यावर उभे असलेल्या दुचाकी वाहनाला आग लागली. यावरुन तापमान किती प्रचंड आहे याची कल्पना येते. तेव्हा शहरातील प्रथम नागरिक या नात्याने या गंभीर बाबीची दखल घेवून शहरातील गांधी रोड, तिलक रोड, पोस्ट ऑफीस ते रेल्वे स्टेशन रोड, गोरक्षण रोड, नेकलेस रोड यासह काही महत्त्वाच्या रस्त्यांवर दुपारनंतर पाण्याचा शिंपडावा केल्यास तापमानातील उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

Oplus_131072

गोरक्षण रोडच्या मुख्य रस्त्यांवर चार बंगल्याच्या शेजारी खुल्या भुखंडावर नगरसेवक असताना लावलेल्या शेकडो कडुलिंबाच्या झाडांमुळे तेथील तापमान तीन ते चार डिग्री सेल्सियस कमी असल्याचे दिसून आले. मात्र सदर परिस्थितीत आपण मुख्य रस्यांवर पाण्याचा शिंपडावा करावा. जेणेकरुन सदर उच्चांकी उष्ण तापमानात काही प्रमाणात घट निर्माण होईल व अकोला शहरवासियांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. याकरिता आपण अकोला शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मागणीचा गंभीरतेने विचार करुन या उपायाची अंमलबजावणी कराल, असं ठाकरे यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!