Thursday, April 23, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील बसंती हॉस्पिटलचा ३८ वा वर्धापन दिन उद्या ! सेवेची उज्ज्वल परंपरा

अकोल्यातील बसंती हॉस्पिटलचा ३८ वा वर्धापन दिन उद्या ! सेवेची उज्ज्वल परंपरा

• ६९ हजारांहून जास्त ऑपरेशन • १ लाख ४० हज़ार डायलिसिस : समाजसेवेचा ठसा अधिक दृढ

अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील श्रीमती बसंती चांडक रीलीफ़ फाउंडेशन द्वारा संचालित बसंती हॉस्पिटल आपल्या सेवाभावी कार्याचा उद्या शुक्रवार २४ एप्रिल २०२६ रोजी ३८ वा वर्धापन दिन साजरा करत आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदानाची परंपरा अधिक बळकट केली आहे. लक्ष्मीनारायण चांडक यांच्या धर्मपत्नी बसंती चांडक यांच्या नावाने २४ एप्रिल १९८८ रोजी या ट्रस्टची स्थापना केली. स्थापनेपासून आजपर्यंत अकोला नेत्र अस्पतालमार्फत नेत्रशस्त्रक्रियेच्या क्षेत्रात मोठे कार्य करण्यात आले असून सुमारे ६९ हजारांहून अधिक डोळ्यांच्या ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले आहेत.

तसेच मागील ११ वर्षांपासून डायलिसिस सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत सुमारे १ लाख ४० हजारांच्या जवळपास डायलिसिस प्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्ण करण्यात आल्या आहेत. याशिवाय फिस्टुला व किडनी स्टोन या सारख्या शस्त्रक्रियाही बसंती हॉस्पिटल मध्ये नियमितपणे करण्यात येत असून रुग्णांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सेवाभावी ट्रस्टचे कार्य उल्लेखनीय
या कार्यात ट्रस्टी श्याम चांडक, रमाकांत खेतान, वंदना मेहता व हीरक मेहता यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. अशी माहिती देताना बसंती हॉस्पिटलचे व्यवस्थापक विजयकुमार मुंदडा म्हणाले की, भविष्यातही अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला. एकूणच, गेल्या ३८ वर्षांपासून समाजातील गरजू रुग्णांना दिलासा देत बसंती हॉस्पिटलने आरोग्यसेवेतील आपली सामाजिक बांधिलकी यशस्वीपणे जपली असून, पुढील काळातही ही सेवा अखंडपणे सुरू राहणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!