Thursday, April 23, 2026
No menu items!
No menu items!
Home.. तर प्रॉपर्टी टॅक्सवर 10 टक्के सुट ! देव यांच्या प्रयत्नाला यश

.. तर प्रॉपर्टी टॅक्सवर 10 टक्के सुट ! देव यांच्या प्रयत्नाला यश

अकोला दिव्य न्यूज : अकोला महानगरपालिकेच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी नागरिकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला असून, ऑनलाईन पद्धतीने आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना सामान्य करावर १० टक्के सुट देण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे.

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना निलेश देव यांनी लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार एप्रिल, मे व जून या कालावधीत आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत जाहीर करण्याची ठोस मागणी केली होती. नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि महानगरपालिकेचा महसूल वाढावा या उद्देशाने ही मागणी करण्यात आली होती.

या मागणीची सकारात्मक दखल घेत महानगरपालिकेने त्वरित निर्णय घेत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना १०% सवलत जाहीर केली आहे. या निर्णयामुळे अकोलेकर नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयाचे ठळक फायदे पुढीलप्रमाणे—
✔️ सामान्य करावर थेट १०% आर्थिक सवलत
✔️ ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन व पारदर्शक व्यवहार
✔️ वेळेची बचत व सोपी प्रक्रिया
✔️ महानगरपालिकेच्या महसुलात वाढीस चालना
✔️ नागरिकाभिमुख व डिजिटल प्रशासनाला बळ

यावेळी निलेश देव म्हणाले की,
“ही केवळ मागणी नव्हती, तर अकोलेकर नागरिकांच्या हितासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा होता. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आता सर्व नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरून १०% सवलतीचा लाभ घ्यावा, हेच आवाहन आहे.

👉 नागरिकांसाठी आवाहन :
अकोला महानगरपालिकेचा मालमत्ता कर 2026-2027 या आर्थिक वर्षात एप्रिल, मे व जून या कालावधीत आगाऊ भरून, ऑनलाईन पेमेंटद्वारे १०% सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!