अकोला दिव्य न्यूज : सीबीएसई दहावीचा निकाल नुकताच जाहिर झाला असून अकोला येथील प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थीनी आर्या राठी हिने 500 पैकी 499 (99.80 टक्के) गुण घेऊन अव्वल स्थान पटकाविले आहे. तसेच शुभ पटेल या विद्यार्थ्याने 99.40 गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला आहे. आर्याला 4 विषयात 100 पैकी 100 गुण असून एका विषयात 99 गुण आहेत.

त्यासोबतच शरयु राऊत 98.80, गायत्री येवले 98.20, स्वराली जामकर 98.20, समृद्धी अंधारे 98.00, यथार्थ माणिकराव 98.00, अक्षरा इंगळे 98.00, क्रीष्णा भुजाडे 98.00 टक्के, सार्थक नागे 97.80, प्रणाली खांदेल 97.80, गार्गी गरकल 97.80, पार्थ इंगवले 97.80, रजत तायडे 97.60, यश गिरी 97.60, अंजली वाकोडे 97.00, पार्थ देशमुख 96.80, सर्वेश धोलवडे 96.80, अन्वी जायभाये 96.80, आदित्य बाहेकर 96.60, रैवत देशपांडे 96.60, शरवरी गरकल 96.60, श्रावणी ढोरे 96.60, समर शिंदे 96.60, शाश्वत महल्ले 96.20, अर्णव टोंगसे 96.20, अलंकार डंबाळे 96.20, प्रणिल नावकार 96.00, आर्यन उन्हाळे 96.00, माही अग्रवाल 96.00, श्रीशांत सुर्यवंशी 95.80, जान्हवी तराळे 95.80, राशी खवले 95.80, श्रावणी कवलकर 95.80, अथर्व आखरे 95.80, आरुष घोडे 95.60, सई देशमुख 95.60, रितीका आलिमचंदानी 95.60 यांना 96 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. याशिवाय परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 102 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
एकूण 63 विद्यार्थ्यांनी विविध विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त करून सीबीएसई बोर्डात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. याशिवाय गणित विषयात 11 जणांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मराठी विषयात 10 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले असून 78 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत. संस्कृत विषयांमध्ये 14 विद्यार्थ्यांना पैकीची पैकी गुण मिळाले असून 52 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत. हिंदी विषयांमध्ये 11 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विज्ञान विषयांमध्ये 2 विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी गुण मिळाले असून 59 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण आहेत. समाजशास्त्र विषयात 1 विद्यार्थी पैकीचे पैकी मिळवून अव्वल ठरला आहे. तर 101 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत.

माहिती व तंत्रज्ञान विषयात 33 विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी गुण मिळाले असून 158 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. इंग्रजी विषयांमध्ये 3 विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी गुण मिळाले असून 107 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यशस्वी गुणवंतांचे प्रभातचे संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका सौ.वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, समन्वयक मो. आसिफ, सीबीएसई समन्वयक प्रशांत होळकर, स्पर्धा परीक्षा प्रमुख व्ही अनुराधा यांनी अभिनंदन केले.
