Monday, March 2, 2026
No menu items!
No menu items!
Homeरुक जाना नहीं तू कहीं हार के..! अनिकेतने CA होऊनच उत्तर दिले…

रुक जाना नहीं तू कहीं हार के..! अनिकेतने CA होऊनच उत्तर दिले…

अकोला दिव्य न्यूज : ‘रुक जाना नहीं तू कहीं हार के……’, होय अनिकेत शेटे याचे यश पाहून या गाण्याच्या ओळीच आठवतात. अनिकेत याने गेल्या आठ ते नऊ वर्षात केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळाले. यश एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी संयम, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास लागतो. अनिकेत शेटे याचे यश हेच शिकवते. चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनिकेतने तब्बल नऊ वर्षे या कठीण परीक्षेसाठी दिली. या प्रवासात त्याने पाच ते सहा वेळा परीक्षा दिली, अपयश पाहिले, पण कधीही हार मानली नाही. अखेर सातव्या प्रयत्नात त्याने यश खेचून आणले. “अजून किती दिवस अभ्यासच करणार? असा प्रश्न करणाऱ्यांना आता त्याच्या निकालानेच गप्प केले आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

अनिकेत शेटे हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द या गावचा. त्याचे शालेय शिक्षण येथील शिवराज विद्यालयात झाले. त्याने पुढे कोल्हापुरात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या पुढील सर्व शिक्षण पुण्यात झाले. यानंतर त्याने सीए आर्टिकलशिप पुणे येथील वखारिया एस के आणि असोसिएट्स इथे केली. तेव्हापासून त्याने सीए’च्या परीक्षेची तयारी सुरू केली.

नऊ वर्षात अनेक अडचणी आल्या तरी…………………………. या नऊ वर्षांच्या काळात अनिकेतसमोर केवळ अभ्यासाचेच नाही तर मानसिक संघर्षाचेही मोठे आव्हान होते. घरात पाहुणे आले की, गावात कोणी भेटले की एकच प्रश्न विचारला जायचा,  “मुलगा अजून काय करतोय? किती दिवस परीक्षा देणार?” अशा टोचणाऱ्या प्रश्नांनी अनेक जण खचले असते, पण अनिकेतने त्यावर संयमाने मात केली. लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवणे त्याने निवडले.

अपयश आले तरी त्याने स्वतःवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, चुका सुधारत आणि नव्या जोमाने पुन्हा उभा राहत तो पुढे जात राहिला. या संपूर्ण प्रवासात अनिकेतसाठी सर्वात मोठी ताकद ठरली ते म्हणजे त्याचे कुटुंब. परिस्थिती कठीण असताना, निकाल नकारात्मक येत असताना, कुटुंबीयांनी त्याचा हात कधी सोडला नाही. “तू करू शकतोस” हा विश्वास त्यांनी कायम त्याच्यात जिवंत ठेवला. आज अनिकेत शेटे सीए परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. हे यश नऊ वर्षांच्या संयमाचे, संघर्षाचे आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे मिळाल्याचे अनिकेत सांगतात.

वडिलांनी खासगी कंपनीत जॉब करुन आम्हा तिनही भावडांना शिकवले, वडिलांची हालाकीची परिस्थिती होती. त्यांनी त्यातुनही मला सीए बनवण्यासाठी प्रयत्न केले.  माझ्या यशात माझ्या कुटुंबीयांचा सपोर्ट होता. अनेक वेळा खचलो त्यावेळी भावाने दिलेला सपोर्ट हा माझ्यासाठी मोठा होता. भाऊ अतुल मला नेहमी आत्मविश्वास द्यायचा. या यशात त्याचा मोठा वाटा आहे. आई, पप्पा, बहिण, वहिणी, भाऊजी यांनीही वेळोवेळी मला सपोर्ट दिला. ज्यावेळी माझा आत्मविश्वास डळमळतोय असं वाटलं तेव्हा कुटुंबीयांनी साथ दिली. आठ ते नऊ वर्षे वेळ देऊन मी अभ्यास केला. अनेक वेळा मला अपयशाला सामोरे जावे लागले. पण, मी अभ्यास करणे सोडले नाही. पुन्हा, पुन्हा प्रयत्न करत राहिलो. अखेर यश मला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!