Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeबार्शीटाकळी पोलिसांची खाबूगिरी ! चक्क आरोपीलाच अभय ? तक्रारकर्त्याचा आमरण उपोषणाचा इशारा

बार्शीटाकळी पोलिसांची खाबूगिरी ! चक्क आरोपीलाच अभय ? तक्रारकर्त्याचा आमरण उपोषणाचा इशारा

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील पोलिसांची खाबूगिरी वाढत चालली असून खिसे गरम करण्यासाठी आरोपींना जामीन मिळवून देण्यात कायदेशीर सोपस्कारात पद्धतशीर मदत करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जेव्हा तक्रारदाराने विचारले असता, असभ्य भाषेत तुम्ही IG पर्यंत गेले तरी काही होत नाही.अशा उद्धट उत्तरे दिली. सदर प्रकरणात तक्रारदाराने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

बार्शी टाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पद्मावती कापूस प्रक्रिया केंद्रातील 18 रेचाच्यावर लावलेल्या 5 एचपीच्या 18 मोटर आणि बेल्ट सिस्टमच्या 3 एचपीच्या 3 मोटर तसेच air separator ची 5 एचपीची 1 मोटर या सर्व योग्य सुयोग्य स्थितीत व वापरात असलेल्या आणि ज्यांना पुली व गियर box लागलेल्या क्राम्टन ग्रव्हिज कंपनीच्या तब्बल 22 मोटर चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच तातडीने पोलिस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींवर 4 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री 2 वाजताच्या सुमारास कान्हेरी सरप येथील वेदांत प्रभाकर सरप, किशोर इंगळे, गणेश आगरकर या तीन आरोपींना 10 डिसेंबरला सायंकाळी अटक करून चुकीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान बार्शिटाकळी पोलिसांनी अकोला हिंगणा फाटा आरोग्य नगर येथील सोनू खान आणि सर्व मोटर खरेदी करणारा अकोला खदान येथील रेशू पैलवान भंगारवालाचा मुलगा याला सर्व माहिती असताना 12 डिसेंबर 2025 रोजी दिवसभर त्याला बसवून रात्री 9 वाजता अटक करण्यात आली.

मुद्देमाल जप्त केल्यानंतर तक्रारकर्ता प्रविण हुंडीवाले यांना मुद्देमाल दाखवून खातरजमा केली गेली नाही. खातरजमा का केली नाही आणि कोणाचा सांगण्यावरून हुंडीवाले यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले नाही, हे अनुत्तरीत आहेत. बार्शिटाकळी पोलिसांच्या या कृतीने 13 डिसेंबर 2025 रोजी जामीन मिळून दिला.

विशेष म्हणजे आरोपींना जामीन मंजूर होऊन ते मोकाट झाल्यावर हुंडिवालेंना मोटारी दाखवण्यात आल्या. तेव्हा या मोटरी माझ्या नाही माझ्या मोटारी क्रॉम्प्टन कंपनीच्या आहेत.असे सांगितले. याबाबत ठाणेदारांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ठाणेदार म्हणाले की, तुम्ही पहिले का नाही बघितल्या. आता त्यांना जामीन झाला आहे. आता त्यांना कसे आणणार असं उत्तर दिले. जेव्हा की हुंडिवाले सकाळी 2 तास थांबून सुद्धा मोटरी दाखवण्यात आल्या नाही. आणि सायंकाळी बोलावल्यावर असे उत्तर देतात. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.

चोरीला गेलेल्या क्रॉम्प्टन कंपनीच्या 22 च्या 22 मोटर परत नाही मिळाल्या नाहीत तर 4 दिवसात उपोषणाला बसेल. असा इशारा हुंडिवाले यांनी दिला. विशेष म्हणजे ठाणेदाराचे writer यांनी असभ्य भाषेत तुम्ही IG पर्यंत गेले तरी काही होत नाही.अशी धमकीची भाषा वापरली. आता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.अशी माहिती प्रविण हुंडीवाले यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!