Saturday, November 23, 2024
Homeअर्थविषयकज्ञानचंद गर्ग अध्यक्ष तर शीला राठी उपाध्यक्ष व दिपक मायी सचिव ;...

ज्ञानचंद गर्ग अध्यक्ष तर शीला राठी उपाध्यक्ष व दिपक मायी सचिव ; निवडणुकीत अविरोध निवड

अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागरिक बॅंकेच्या कामकाजात एकवाक्यता आणि येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन, एकजुटीने त्या दूर करण्यासाठी मागील ३० वर्षांपासून कार्यरत अकोला-वाशिम जिल्हा बॅंक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मल्टीस्टेट अकोला जनता बॅकेचे अध्यक्ष ज्ञानचंद लक्ष्मणदासजी गर्ग यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी वाशिम अर्बन बँकेच्या अध्यक्षा शिलाताई सुभाषजी राठी आणि अकोला अर्बन बँकेचे संचालक दिपक मायी यांची सचिवपदी सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली आहे. या सोबतच ७ कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.

सहकारी नागरिक बॅंकेच्या कामकाजात येणाऱ्या समस्या व प्रश्नांची उकल करुन बॅंकेकडून अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा उपलब्ध करून, बॅंकांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ३० वर्षापुर्वी अकोला व वाशीम जिल्ह्यातील नागरिक बॅंकेच्या संचालकांनी एकत्रित येऊन अकोला-वाशिम जिल्हा बॅंक असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या कालावधीत अनेक समस्या मार्गी लागल्या आणि दरवेळी सर्वानुमते निर्णय घेत, बॅंकांच्या कामकाजात पारदर्शकता आणली. सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत गठीत असोसिएशनचे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी आज शुक्रवार २९ डिसेंबरला अकोला जनता बॅंकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला कार्यालयाच्या अधिक्षक भाकरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत अकोला जनता बॅक, अकोला अर्बन बँक, वाशिम अर्बन बँक, सन्मित्र बॅंक व अग्रसेन या सदस्य बॅंकेकडून निर्देशित प्रत्येक दोन सदस्य उपस्थित होते.

निवड प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या तीन पदांसाठी अनुक्रमे ज्ञानचंद गर्ग, शिलाताई राठी व दीपक मायी यांची निवड अविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी भाकरे यांनी जाहीर केले. तद्वतच कार्यकारिणी सदस्यांची निवड अविरोध झाल्याचे सांगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष गर्ग यांनी सर्वांच्या सहकार्यासाठी आभार व्यक्त करुन, जिल्ह्यातील नागरिक बॅंकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सर्वांच्या साथीने प्रयत्न करु असे आश्वासन दिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी स्वागत केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!