अकोल्यातील रुग्णांच्या जेवणात चक्क अळ्या व किडे !सर्वोपचारमधील भ्रष्ट कारभाराचा नमूना

0
अकोल्यातील रुग्णांच्या जेवणात चक्क अळ्या व किडे !सर्वोपचारमधील भ्रष्ट कारभाराचा नमूना

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्रमांक ३१ मध्ये शुक्रवारी देण्यात आलेल्या जेवणात चक्क किडे व अळ्या निघाल्याचा धक्कादायक तसेच किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणातील अळ्या व किडे रुग्णाच्या ताटात निघाल्यानंतर त्यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे ताट व ताटातील अन्न फेकून देत रुग्णास रुग्णालयाच्या बाहेर काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या गलथान कारभाराने कळस गाठल्याचे वास्तव आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आलेले आहे. डॉक्टरांच्या तसेच प्रशिक्षणार्थ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचेही आरोप झाले आहेत. वाढती रुग्णसंख्या व त्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ असल्याच्या नेहमीच ओरड असल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची प्रशासनाची बाजू आहे.

https://youtu.be/qNfY4qcG7uY?si=_wSjnNnVd6RU0HG9

मात्र अन्नपदार्थांमध्ये चक्क किडे आणि अळ्या निघाल्यानंतर प्रशासनाने यावर उपाययोजना न करता हा प्रकार लक्षात आणून देणाऱ्या रुग्णासच धाकदपट करीत बाहेर काढून दिले. रुग्णाच्या ताटातील अन्नपदार्थांमध्ये किडे व अळ्या वळवळ करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसा व्हिडिओही सर्वत्र व्हायरल झालेला आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाने अद्याप संबंधित दोशींवर कारवाई न केल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here