अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दुष्काळग्रस्त शेतकरी,शेतमजूर यांचा मुला, मुलींचे लग्न कमी खर्चात करणे. त्यांना आदर्श विवाहासाठी आग्रह करून नवीन परंपरा निर्माण करणे गरजेचे आहे.असा निर्णय पाटील समाज वधू सूचक मंडळाच्या सभेमध्ये घेतला आहे. आदर्श आणि माफक खर्चात विवाह सोहळा करण्यासाठी जनजागृतीचे कार्य आधीपासुनच पाटील समाज वधू वर सूचक मंडळ करीत आहे. यापूर्वी बऱ्याच मुला मुलींचे आदर्श पद्धतीने लग्न मंडळाने केले आहेत.

मंडळाच्या अध्यक्षांचा कालावधी संपल्यामुळे नवीन अध्यक्षाची निवड करणे, लगीनगाठी वेबसाईट अद्यावत करणे, वधू- वर सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेणे आणि इतरही विषयांवर विचार विनिमय व चर्चा होऊन सर्व संमतीने निर्णय घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक सुभाष पाटील म्हैसने होते, कार्यक्रमाचे संचालन अँड.संतोष गोळे, प्रास्ताविक वसंतराव माळी यांनी केले.आभार अरुण खोटरे यांनी मानले. सभेमध्ये डॉ अशोक ओळंबे, संजय इंगळे, श्याम मते पाटील, प्राध्यापक संजय म्हैसने, संजय मालोकार,मोहन पाटील, रवींद्र निर्मळ, दीपक भाकरे, चंद्रकांत ताठे, डॉ तेजराव नराजे,प्राध्यापक विनायकराव धोरण,नंदकिशोर गावंडे, प्राध्यापक देवलाल उजाळे हिम्मतराव पोहरे,रमेश बारब्दे,संतोष काटे,संतोष आखरे, आर.पी अंधारे यांचासह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.