अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : प्रभात किड्स स्कूलच्या ३ वूशुपटूंनी जिल्हास्तरीय वूशुस्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये तिन वूशुपटूंनी चमकदार कामगिरी करून उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने दोन वूशुपटूंची विभागीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हास्तरीय वूशु स्पर्धेमध्ये 17 वर्षाआतील मुलींमध्ये 40-46 वजन गटात प्राजक्ता पांडे हिने प्रथम क्रमांक मिळविला तर श्रिया बोडखे द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मुलांमध्ये 38-44 वजन गटात आदित्य वानखडे ह्याने प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
प्रभातचे क्रीडा प्रशिक्षक संजीवनी गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल मांदाळे व क्रीडा उपप्रमुख आशिष बेलोकार यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.
