Home१०० टक्के निकालाची संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटची परंपरा कायम

१०० टक्के निकालाची संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटची परंपरा कायम

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा नुकताच जाहीर करण्यात आलेल्या निकालात निमवाडी येथील संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली. मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालय द्वारा संचालित संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नव्या पातळे या विद्यार्थिनीने 86.80 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. द्वितीय क्रमांक प्रगती गोंडचवर (84.40) तर तृतीय क्रमांक जतिन रायसिंग (82.60) यांनी प्राप्त केला.

यासोबतच सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या व्यवस्थापन मंडळ आणि शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षिकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular