Homeअकोल्यात कॉन्ट्रॅक्टरचा राडा ! चौघांना मारहान आणि स्कॉर्पीओ गाडीच्या काचा फोडल्या

अकोल्यात कॉन्ट्रॅक्टरचा राडा ! चौघांना मारहान आणि स्कॉर्पीओ गाडीच्या काचा फोडल्या

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा डीपीडीसी मधील २ कोटी ६० लाख रुपयांच्या वर्कऑर्डर समसमान सर्व १५ कॉन्ट्रॅक्टरांना वाटायच्या होत्या. मात्र, भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांने कार्यकारी अभियंता यांना आर्थिक देवाणघेवाण करून चार एजन्सीजच्या नावाने पूर्ण वर्कऑर्डर काढण्यात आल्या आहेत. असा गंभीर आरोप इतर कॉन्ट्रॅक्टरांनी केला आहे.

या बाबत इतर कॉन्ट्रॅक्टरांना कुजबुज लागताच त्यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण, अधीक्षक अभियंता अकोला व मुख्य अभियंता यांना मेल करून प्रत्यक्ष भेटण्यासाठी गेले. यावेळी संबंधित कॉन्ट्रॅक्टर विद्युतभवनच्या इमारतीबाहेर आल्यानंतर त्याने सुरेश इमाने, अमित अग्रवाल व चावडा यांना मारहान केली आणि एका स्कॉर्पीओ गाडीच्या काचा फोडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

मारहान करणारा पदाधिकारी भाजपा संबंधित असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व पुरावे मिटवण्याची शक्यता इतर कॉन्ट्रॅक्टकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची महावितरण मुख्य कार्यालय प्रकाशगड मुंबई यांनी चौकशी करावी, अशी मागणी इतर सर्व कॉन्ट्रॅक्टरकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular