‘सन्मित्र’ची सुरेल यशोगाथा ! संगीत-गायन परीक्षेत विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य

0

अकोला दिव्य न्यूज : अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबईतर्फे आयोजित संगीत गायन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, बिरला कॉलनी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या परीक्षेत शाळेतील एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये वेदश्री मानकर, श्रुतिका जवळकर, माही दामोदर, अनुश्री शर्मा, अनुष्का जुनारे, प्राविन्या शेगोकार, धनश्री नेमाडे, मृणाली लोखंडे, आराध्या सागर, मनस्वी भरणे व आराध्या वाघोडे यांचा समावेश आहे.

तसेच, प्रथम श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये योगीराज देशमुख, विजय गवई, आरुष टोबरे, भाविक काजळे, नील जाधव, स्वरा मुरूमकर, अनुष्का पटेल, दर्शना बेलसरे, अंजली चराटे, ऋतुजा वानखडे, साची इंगोले व आरोही माने यांचा समावेश आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रा. शुभम नारे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व शिक्षकवृंदाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here