अकोल्यातील 25 पासून ग्रहण काळातील परंपरा कायमचं

0

अकोला दिव्य न्यूज : सुर्य ग्रहण असो की चंद्र ग्रहण, खग्रास रहो की खंडग्रास राहो, मागील २५ वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत काल मंगळवार ३ मार्च रोजी पार पडलेल्या चंद्र ग्रहणाच्या काळात राज राजेश्वर मंदिरात हरिनाम आणि ओम नमः शिवाय जपासह संगीतमय सुंदरकांड पठण व गायन भक्तीभावाने श्रद्धापूर्वक करण्यात आले.

सार्वजनिक सुंदरकांड मध्ये शेकडो भाविक भक्तांनी भाग घेतला. सुंदरकांड पठणात मुख्य गायक कीर्तनकार पं. श्याम शर्मा यांच्या मार्गदर्शनात गायक देवेंद्र तिवारी, अतुल जोशी, योगेश कस्तुरे तसेच ढोलक वादक नितीन गायकवाड, ऑर्गनप्लेयर राहुल पवन,दीपक ऊर्फ भटटू तिवारी, अनिल नृपनारायण, बंटी जोशी, कमलेश वर्मा, मनीष वर्मा, दिलीप वानखडे यांनी सुंदरकांड गायन मध्ये सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी राज राजेश्वर आरती मंडळाचे सदस्य राजू चाळसे महादेव भोंबळे, गोपाल मांडेकर, सचिन भिरड, प्रभाकर भोंबळे, दिलीप मोयल, संजय शर्मा, संजय जसनपूरे, राज राजेश्वर विश्वस्त मंडळाचे अँड.ठाकरे, अँड.गिरीश देशपांडे, नरेश लोहिया यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. कार्यक्रमात शिवभक्त मंडळाचे दिलीप नायसे, श्रीराम भक्त, प्रमोद दांदले, गजुभाउ ठाकुर आणि उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सुंदर कांड, हनुमान चालीसा आणि नाम जप संपल्यावर सर्वांनी मिळून मंदिरातच स्नान करून राज राजेश्वर मंदिराचे दरवाजे केले. संपूर्ण मंदिर व परिसर स्वच्छ करून मंदिरातील शिवलिंगची पुजा व अभिषेक करून आरती केली. पंचवीस वर्षांपूर्वी ग्रहण काळात सुंदर कांड आणि नाम जप करण्याची सुरुवात राजेश्वर आरती मंडळाचे अध्यक्ष चाळसे काका यांनी केली आहे.


संपूर्ण अकोला शहरांमध्ये रामचरितमानसचे पाचव्या अध्यायातील सुंदरकांड पठणाला एका वेगळ्या प्रकाराने प्रस्तुती करताना अकोला शहरासह महाराष्ट्रभर राज राजेश्वर दरबार सुंदर कांड मंडळ मागील 33 वर्षा पासून निःस्वार्थ सेवा देत आहेत.

अकोल्यातील पंडित कीर्तनकार श्याम शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरकांड गायन शिकून अनेक मंडळे तयार झाली आहे.‌वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर कांड करून धर्मांच्या प्रचारासोबत स्वतःचं उदरनिर्वाह देखील करत आहेत. पोलिस विभागात पोलिस उप निरीक्षक पदावर कार्यरत श्याम शर्मा ही निःस्वार्थ सेवा देत आहेत.
तुलसीदास यांनी सांगितलेला आहे की देवाने या जगाची निर्मिती ‘कर्मप्रधान’ तत्वांवर केली आहे. ‘कर्मप्रधान विश्व करी राखा’ म्हणून कोणीही कर्म सोडू नये. निरंतर कर्म करत राहावे. कर्म केल्यानेच हा देश प्रगतीपथावर पुढे पुढे जात राहील.असं शर्मा यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here