साखरेचे ‘हार-कंगन’ ! मुस्लिम हलवाई कुटुंब बनवते अन् हिंदू करतात खरेदी

0

अकोला दिव्य न्यूज : अलिकडच्या काळात हिंदू मुस्लिम वादाच्या अनेक बातम्या दररोज ऐकत असतो. देशभरात रोज कुठे ना कुठे अशा बातम्या किंवा वाद झाल्याचं पाहायला ही मिळतं असताना मात्र धुळ्यात अनोख्या परंपरेने हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. सर्वजण एक असावे, हेच या परंपरेतून दिसून येते. हिंदू सणासाठी त्यामुळेच इथले मुस्लिम झटत असल्याचं दिसून येत आहे. यात व्यवसाय हा भाग असला तरी त्या मागची भावना ही महत्वाची मानली पाहीजे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

हिंदूंच्या होळी आणि गुढीपाडवा या सणाला गेल्या 40 वर्षांपासून धुळ्यातील मुस्लिम समाज हार-कंगन तयार करतात आणि हिंदू कुटुंब ते विकत घेऊन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे या सणाला विशेष असं महत्त्व आहे.यंदा रमजान महिन्यातील रोजे (उपवास) फेब्रुवारी महिन्यात आले आहेत. मात्र रोजे ठेवूनही मुस्लिमबांधव हार कंगन बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसून आले आहे.

होळी आणि गुढीपाडवा हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या सणासाठी हार कंगन हा पदार्थ महत्त्वाचा मानला जातो आणि हे पदार्थ तयार करण्याची धुळ्यातल्या हलवाई परिवाराने चाळीस वर्षांची परंपरा राखली आहे. त्यांच्याकडूनच हार कंगनाची खरेदी केली जाते. त्यांनी ही परंपरा आज ही कायम राखली आहे.

बाबुलाल अझमुद्दीन हलवाई या मुस्लिम परिवाराने गेल्या 40 वर्षांपासून वडिलोपार्जित हार कंगन तयार करण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे या मुस्लिम परिवाराकडूनच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात हार कंगन खरेदी करतात. त्यामुळे या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला गेला आहे. रमजान सारखा पवित्र महिना सुरू असताना देखील हिंदू बांधवांच्या होळी व गुढीपाडवा या सणासाठी मुस्लिम कुटुंबीयाने कंबर कसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here