आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! कोण आहेत सुनेत्रा अजित पवार ? जाणून घ्या.

0

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी आज शनिवार ३१ जानेवारीला त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. ही निवड झाल्यानंतर लगेच संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री म्हणूनही लोकभवनावर अत्यंत साधेपणाने त्यांचा शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची आज दुपारी दोन वाजता विधानभवनात बैठक होऊन त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल.

संग्रहित छायाचित्र

कोण आहेत सुनेत्रा अजित पवार ?
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातला. धाराशिवचे नेते, माजी मंत्री आणि शरद पवारांचे जुने स्नेही पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला होता. १९८० मध्ये त्यांचे अजित पवार यांच्याशी लग्न झाले. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर होत्या. बारामतीमध्ये शेती आणि समाजकारणात त्यांचा सहभाग मात्र होता.

पर्यावरण आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडित काम करत आल्या आहेत.

तसेच बारामतीमधील महिलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी टेक्सटाईल पार्कची सुरुवात केली. याज या पार्कमध्ये हजारो महिला काम करत आहेत. २००६ पासून टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. तसेच त्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही विश्वस्त म्हणून काम करत आहेत.

२०२४ ची लोकसभा आणि कौटुंबिक वाद
२०२३ साली अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि अजित पवारांचा गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला.

२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिली. पवार कुटुंबासाठी हा मोठा कसोटीचा काळ होता. या निवडणुकीत पवार कुटुंब सरळ सरळ दोन गटात विभागलेले दिसले. अजित पवारांचे सख्खे बंधू आणि त्यांच्या अडचणीच्या काळात नेहमी साथ देणारे श्रीनिवास पवारही शरद पवार यांच्या बाजूने होते. मात्र सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांना खंबीर साथ देत नेटाने लोकसभेचा प्रचार केला. मात्र त्यांचा विजय होऊ शकला नाही.

सुप्रिया सुळे यांना ७.३२ लाख मते मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना ५.७३ हजार मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांनी १.५९ लाख मतांनी विजय मिळवला होता.

राज्यसभेच्या खासदार
लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. या जागेवर १३ जून २०२४ रोजी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्या राज्यसभेच्या सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here