अकोल्यात विद्यार्थ्यांसाठी उद्या EDU EXPO 26 !

0

अकोला दिव्य न्यूज : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि करिअर संबंधी आवश्यक असे योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षा सहयोग संस्थानद्वारे UG & PG EDU EXPO 2026 शैक्षणिक प्रदर्शनी उद्या शनिवार 31 जानेवारीला शहरातील जवाहर नगर येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनीचे
आयोजन रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ, जेसीआई अकोला सिटी आणि अग्रवाल समाज समिति, अकोला यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये देशातील विविध प्रतिष्ठित UG आणि PG कॉलेज विद्यापीठे आणि इतर नामवंत शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधि उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांना कोर्सची अभ्यासक्रमाची निवड प्रवेश प्रक्रिया फीस संरचना, स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन आणि करियर विकल्प बाबत सविस्तर माहिती देणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे UG एवं PG महाविद्यालयांशी सरळ संपर्क आणि संवाद तसेच करियर गाइडंस आणि काउंसिलिंग एकाच मंचावर आणि कॉमन एप्लीकेशन फॉर्म स्कॉलरशिप एज्युकेशन लोन संबंधी शिक्षा सहयोग संस्थेचे करियर मार्गदर्शक अमोल ओमप्रकाश अग्रवाल करणार आहेत.ते विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.
प्रदर्शनी वर्ग अकराव्या आणि 12 वी तसेच ग्रेज्युएशन आणि पोस्ट ग्रेज्युएशनच्या विद्यार्थ्यांना उपयोगी सिद्ध होणार आहे. या संधीचा विद्यार्थी आणि पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब अकोला नॉर्थचे अध्यक्ष डॉ.श्रद्धा सलामपुरिया, सचिव प्रा.महेश बाहेती, अग्रवाल समाज समितीचे अध्यक्ष दीपक गोयनका, सचिव विनोद टोरका, जेसीआई अकोला सिटी अध्यक्ष अमोल अग्रवाल, सचिव अभय राठी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here