अकोल्यात उद्या अजितदादा पवार यांना सामुहिक श्रद्धांजली

0

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात तब्बल ५ दशक आपल्या निर्भीड, बेधडक आणि बिनधास्त परंतु पुरोगामी विचारांचा वारसा कायम ठेवत सर्वसामान्य माणसाला त्याच्या हक्काच्या सोयीसुविधा व विकासासाठी झटणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने राज्य आणि राष्ट्र स्तब्ध झाले आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सगळ्यांचेच “दादा” असलेल्या अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या सामुदायिक श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

अकोला जिल्हा परिषद मार्गावरील पोलीस लॉन, येथे स्व. अजित पवार यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी व प्रेरणादायी वारसा नेतृत्वाला स्मरण करण्यासाठी उद्या शनिवार 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांसोबत अजित पवार यांचे स्नेहबंध होते. तळागाळातील लोकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे देखील दादा जीवलग होते. या अनुषंगाने हे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सामुहिक आदरांजली सभेत सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते तसेच चाहत्यांनी सहभागी व्हावे उपस्थित असे आवाहन आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापौर मदन भरगड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here