आता निवड अनुभवाची !हरीश आलिमचंदानी प्रभाग १५ मध्ये बाजी पलटवणार

0

अकोला दिव्य न्यूज : सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर उभं राहिलेलं, जमिनीवरचं नेतृत्व म्हणजेच हरीश आलिमचंदाणी ! वर्षानुवर्षांच्या सामाजिक कार्यातून, प्रभागातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात त्यांनी ‘काम करणारा नेता’ म्हणून आपली ओळख निर्माण केली असून, प्रभाग क्रमांक 15 मध्ये ते बाजी पलटवून विजय खेचून आणणार आहे, असं चित्र दिसत आहे.

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत, प्रभाग क्रमांक १५ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते पुन्हा एकदा निवर्तमान नगरसेवक बाळ टाले, शारदा रणजित खेडेकर आणि मनिषा भंसाली या उमेदवारांसोबत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पायात भिंगरी लावल्यासारखे कधी शारदा रणजित खेडेकर, तर कधी दुचाकीवरून बाळ टाले सोबत आणि मनिषा भंसाली व रवि भंसालीच्या सोबतीने प्रभागातील मतदारांच्या भेटी घेत आहेत. पदयात्रा, सभा आणि कॉर्नर मिटींग घेत सगळा प्रभाग पिंजून काढल्याने वातावरण निर्माण झाले आहे.

जनतेला प्राधान्य, विकासासाठी कटिबद्ध, हा फक्त नारा नाही, तर त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे. अनुभव, प्रामाणिकपणा आणि ठाम निर्णयक्षमता यांच्या जोरावर प्रभागाच्या सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा निर्धार आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी केलेली विकासकामे ही लोकांना माहिती आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वच समाजातील बहुसंख्य लोक ओळखीचे असल्याने ही निवडणूक हरीशभाईनी ही निवडणूक एक हाती घेतली आहे.

आता प्रभागासाठी ‘निवड अनुभवाची… निवड विकासाची, अशी प्रतिक्रिया उमटल्या असून, इतरांकडून आवाहन उभे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असताना आलिमचंदाणी यांनी प्रति आवाहन केले आहे. अशी मतदारांमध्ये चर्चा होत आहे. निवडणूक लढवण्याचा भरपूर अनुभव, सलोख्याचे संबंध आणि मितभाषी असल्याने आज तरी त्यांच आणि सोबतीला असलेल्या भंसाली, खेडेकर व टाले यांच पारड जड वाटत आहे. तरी मत मोजणी नंतरच मतदारांचा कौल दिसून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here