अकोल्यातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला ! प्रकृती गंभीर

0

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर त्यांच्या मुळ गाव मोहाळा येथे चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पटेल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पटेल यांना उपचारासाठी अकोटवरून अकोल्याला हलवले आहे. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहे.‌ हल्ल्या मागील कारण स्पष्ट झाले नाही.

या बातमीचे सर्व अपडेट्स लवकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here