Saturday, May 16, 2026
No menu items!
No menu items!
Homeराजन काबरा CA जगतातील नवा स्टार ! वडीलच आदर्श राहिले आहेत

राजन काबरा CA जगतातील नवा स्टार ! वडीलच आदर्श राहिले आहेत

अकोला दिव्य न्यूज : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे महिन्यात घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, छत्रपती संभाजीनगर येथील राजन काबरा याने सीए फायनल परिक्षेत देशातून प्रथम क्रमांक पटकाविणासोबतच सीए इंटरमीजिएट व फाउंडेशन परीक्षेतही राजन काबरा देशात अव्वल ठरला होता.

सीए फाउंडेशन, इंटरमीजिएट व सीए अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येणे हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जन्मलेलेल्या राजन काबरा आज चार्टर्ड अकाउंटन्सी जगतातील नवा स्टार बनला आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याने फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल या तिन्ही सीए परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आणि २०२५ च्या सीए फायनलमध्ये ऑल इंडिया रँक १ मिळवला.राजन काबरा नेहमीच टॉपर राहिला आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबादचे रहिवासी राजन मनोज काबरा यांनी या परीक्षेत अव्वल स्थान मिळवून त्याने त्याच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्वांना अभिमान वाटला आहे. त्याला ६०० पैकी ५१६ गुण मिळाले. तथापि, त्याने प्रथम क्रमांक पटकावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मे २०२२ मध्ये त्याने सीए इंटरमिजिएट परीक्षेतही पहिला क्रमांक मिळवला होता. त्याआधी, जुलै २०२१ मध्ये, त्याने ४०० पैकी ३७८ गुण मिळवून सीए फाउंडेशनमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. अशा परिस्थितीत, सुरुवातीपासूनच तो टॉपर्सच्या यादीत समाविष्ट आहे.

वडील सीए मनोज काबरा हे आदर्श राहिले आहेत

सीएच्या तिन्ही परिक्षेत देशातून पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या राजन काबरा याला या यशाबद्दल विचारले असता, दररोज एवढे तास अभ्यास करायचा, असा नियम केला नव्हता; पण अभ्यासात सातत्य ठेवले होते. विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना, आपले वडील सीए मनोज काबरा हे आपल्यासमोर आदर्श राहिले आहेत.‌असे राजन काबरा यांनी सांगितले.

आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणज्योतसिंग नंदा यांचा फोन आला आणि त्यांनी मला देशात पहिला आल्याची बातमी दिली व अभिनंदन केले. तेव्हा, विश्वासच बसला नाही. नंतर देशभरातून फोन येऊ लागले आणि मला व माझ्या कुटुंबाला एवढा आनंद झाला की, आभाळ ठेंगणे झाले. नोकरी करायची की व्यवसाय करायचा, याचा अजून निर्णय घेतलेला नाही.असे राजन म्हणाला. अकोला दिव्य कुटुंबाकडून राजन याने मिळविलेल्या अविस्मरणीय यशाबद्दल मनस्वी अभिनंदन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!