आणखी एका मोटरसायकल चोराला अटक ! नांदुरा येथील गुन्हाही उघडकीस

0

अकोला दिव्य न्यूज : मोटरसायकल चोरीच्या तक्रारीची दखल घेत सुरू केलेल्या तपासात आणखी एका मोटरसायकल चोराला अटक करून दोन मोटरसायकल जप्त करण्यासोबतच अकोला जुने शहर पोलीस स्टेशनाच्या तपास चमूने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे घडलेला गुन्हा सुध्दा उघडकीस आणला.

बाळापूर तालुक्यातील मोरगाव सादीजन येथील रहिवासी संजय ज्ञानदेव टेकाडे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्याद वरून अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशन येथे अप नं ३९२/२५ क.३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद होता. सदर गुन्ह्यांच्या तपासात योगेश अकोला तालुक्यातील हिंगणा म्हैसपुर येथील रामेश्वर पेसोडे (३६) याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी कसून तपासणी केली असता सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेली हीरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH 30 Y 845 जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिस कोठडी दरम्यान नांदुरा पोलीस स्टेशन येथील अप नं ३३५/२०२५ मधील चोरी गेलेली मोटरसायकल सुध्दा आरोपी योगेश पेसोडे कडुन जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीन लेव्हरकर, पोउपनि रविंद्र करणकार, पोलीस अमलदार पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, पवन डांबलकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here