बुलढाण्याला ‘दोन-दोन एसपी’ ! खरे एसपी कोण ?पोलिस दलात संभ्रमात

0

अकोला दिव्य न्यूज : बुलढाणा जिल्ह्यात एकाच वेळी दोन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असल्याने गृहमंत्रालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेफळे तातडीने पाेलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले.मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नाही. पोलिस अधीक्षक पदासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जिल्हा प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एसपी विश्व पानसरे आणि नवीन नियुक्त एसपी नीलेश तांबे यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षामुळे पोलिस दलात गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेफळे हे तातडीने पाेलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. ते यावर ताेडगा काढण्यासाठी चर्चा करीत आहेत.

काल शुक्रवार दिनांक ३० मे रोजी सकाळपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नाट्यमय घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वीच बदली झाल्यानंतर न्यायालयीन स्थगिती मिळवणारे पानसरे अचानक गणवेशात कार्यालयात दाखल झाले आणि कोणतेही अधिकृत चार्ज हस्तांतरण न करता त्यांनी खुर्ची ताब्यात घेतली.

दुसरीकडे, शासन आदेशानुसार कार्यभार स्वीकारलेले नीलेश तांबे सध्या ॲडिशनल एसपी बी. बी. महामुनी यांच्या दालनातूनच काम पाहत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आहे. ‘खरे एसपी कोण?’, ‘आदेश कुणाचे पाळायचे?’ अशा प्रश्नांनी पोलिस दलात संभ्रम वाढला आहे. दरम्यान, यावर ताेडगा काढण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेफळे पाेलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here