Saturday, May 16, 2026
No menu items!
No menu items!
Homeधावत्या रेल्वेत महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न! जातीयवाद चिघळून जीवघेणा हल्ला

धावत्या रेल्वेत महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न! जातीयवाद चिघळून जीवघेणा हल्ला

अकोला दिव्य न्यूज : हातामध्ये असणारी रुद्राक्ष माळ व हातावर गोंदविलेले छत्रपती या टॅटू च्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेवरील अवंतिका एक्सप्रेस मध्ये सुरू झालेला वाद चिघळून ठाणे येथील एका महिलेवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलेने व एका सहकारी प्रवाशाने धारदार वस्तूने वार करण्याची घटना घडली. हेल्पलाइनला फोन केल्यानंतर या महिलेला वलसाड येथे उतरवण्यात आले व उपचार केल्यानंतर पालघर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून हल्ला करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

इंदोर येथे शिकत असलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी ठाणे येथील रहिवासी ॲड. शितल शरद भोसले या ३ मे रोजी रात्री अवंतिका एक्सप्रेसमधून सामान्य डब्यातून प्रवास करत होत्या. या सामान्य डब्यात बहुतांश सहप्रवासी अल्पसंख्यांक असल्याची माहिती पीडित महिलेने दिली आहे. ॲड. शितल भोसले यांच्या हातात असलेली रुद्राक्ष माळ व छत्रपतींचे नाव पाहून शेजारी बसलेल्या एका अल्पसंख्याक महिला प्रवासाने वाद-विवाद सुरू केला.

रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही गाडी सफाळे जवळ आल्यानंतर आरोपी महिलेने आपल्या पर्स मधील आधार कॉर्ड व इतर महत्त्वाची कागदपत्र लपविल्याचा आरोप करीत ॲड. शितल भोसले यांचा पैजामा खेचून काढण्यात आला. श्रीमती भोसले यांच्याकडे काही न सापडल्याने या महिलेने हल्ला केला. एका ब्लेडने गळ्याच्या दिशेने केलेला वार हातावर थोपविल्याने त्यांचा हाताला जखम झाली. दरम्यान एका पुरुष प्रवाशाने चावी द्वारे मानेवर हल्ला केला.

दरम्यान या संदर्भात महिलेने हेल्पलाइनवर तक्रार नोंदविल्याने वलसाड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिस आले आणि एकंदर परिस्थिती पाहून त्यांनी पीडित महिलेला तसेच हल्ला करणाऱ्या एक महिला व पुरुष प्रवासाला ताब्यात घेतले. या जखमी महिलेच्या हातावर रुग्णालयात आठ टाके घालण्यात आले असून तक्रार नोंदवण्यासाठी तिला आज सकाळी नऊ वाजता पालघर रेल्वे पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आले. रेल्वे पोलिसांनी सायंकाळी फिर्याद नोंदविली असून दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणात खून करण्याचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी, हिसकावून चोरी व इतर कलमा अंतर्गत पालघर लोहमार्ग पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांचा बंदोबस्त
या घटनेची माहिती मिळताच हिंदू समाजाशी संबंधित विविध घटकांचे प्रतिनिधी या ठिकाणी गोळा झाले असून रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पालघर शहर पोलिसांची मदत घेण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. फिर्याद नोंदविताना रेल्वे पोलिसांनी अनेक महत्वाच्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या नव्हत्या. या बाबत जमलेल्या नागरिकांनी विचारणा केल्यानंतर दोन पुरवणी फिर्याद नोंदविणे पोलिसांना भाग पडले.

वादाची सुरुवात…
“आप ये रुद्राक्ष पेहेनते हो क्या बकवास हैं,” असे सांगितल्यावरून वाद सुरू झाला व पीडित महिलेने, “तुझ्या बरख्याचा मला त्रास होतो असं मी म्हटलं का, मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो” असे बोलाबालीने वादला आरंभ झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!