गरीब रूग्णांचे हाल ! रूग्णालयातील खाटा वाढवा – डॉ. सुधीर ढोणे यांची मागणी

    0
    264

    अकोला दिव्य न्यूज : अकोला मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रूग्णालयात खाटांची संख्या फक्त ४७६ असून दररोज १ हजारपेक्षा अधिक रूग्ण येथे भरती असतात. रूग्णालय प्रशासनाने काही खाटांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र डॉक्टर, परिचारीका, पॅरामेडीकल स्टाफ व औषधी या बाबी केवळ ५०० खाटांसाठी असल्याने रूग्णांचे हाल होत आहे. अनेकदा रूग्णांना जमिनीवर झोपवून इलाज केले जातात. तेव्हा रूग्णांचे हाल टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील खाटांची संख्या एक हजार करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली.

    डॉ.सुधीर ढोणे ना.हसन मुश्रीफ यांच्या सोबत चर्चा करताना

    वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून डॉ. सुधीर ढोणे यांनी त्यांना निवेदन देऊन चर्चा केली.डॉ. सुधीर ढोणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोला येथेच पूर्ण क्षमतेचे मेडिकल कॉलेज व सर्वोपचार रूग्णालय असल्याने येथे बुलढाणा, वाशिम, हिंगोली व अकोला जिल्ह्यातील रूग्ण हजारोंच्या संख्येने दररोज येतात.त्यामुळे या रूग्णालयात रूग्णांची प्रचंड गर्दी असते. अनेक वेळा एकाच खाटेवर दोन रूग्णांवर उपचार केले जातात. तेव्हा ४७६ खाटांची संख्या एक हजार करणे अत्यंत आवश्यक आहे.

    खाटांची संख्या ४७६ वरून एक हजार पर्यंत वाढविण्यासोबतच डॉक्टर, परिचारीका, वार्ड बॉय, पॅरामेडीकल स्टॉफ, सफाई कर्मचारी व अन्य कर्मचार्‍यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ करावी लागणार आहे. सध्या पुरविला जात असलेला औषधांचा साठा व यंत्रसामुग्री दुप्पटीने वाढणार आहे. याशिवाय सध्या अस्तीत्वात असलेल्या इमारतीपेक्षा दुप्पट इमारत उपलब्ध करून द्यावी लागणार आणि रूग्णांचे सध्या होत असलेले हाल टाळता येतील अशी अपेक्षा डॉ. सुधीर ढोणे यांनी व्यक्त केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!