महायुती-2 खातेवाटप : गृह खाते फडणवीसांकडेच ! कुणाकडे कोणतं खात ? वाचा संपूर्ण यादी

0

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याचा बरोबर ३० व्या दिवसी महायुती पार्ट -2 संपूर्णपणे अस्तित्वात आले आले. महायुतीचं सरकार स्थापन झाल्याच्या 15 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन हिवाळी अधिवेशनही झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाला तरी खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर शनिवार 21 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. यामध्ये कळीचा मुद्दा झालेलं गृह मंत्रालय अखेर फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पार्ट -1 मधे हीच खाती तिघांकडे होती.

दादा जे होत ते मिळाले ना……. संग्रहित छायाचित्र

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु असताना खाते वाटप होईल असं वाटतं होतं. मात्र, आठवडा झाला तरी खातेवाटप होत नव्हतं. मात्र, आज अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. खरं तर महायुतीत गृहखात्यासाठी शिवसेना (शिंदे) आग्रही असल्याचं बोललं जात होतं. मात्र, गृहखातं सोडण्यास भाजपाने नकार दिला होता. अखेर गृहखातं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळाचं संपूर्ण खातेवाटप पुढील प्रमाणे

१) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गृह, ऊर्जा आणि कायदा व न्याय
२) एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री) – नगरविकास, गृहनिर्माण
३) अजित पवार (उपमुख्यमंत्री) – वित्त आणि नियोजन४) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
५)राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
६)हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण
७)चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
८)गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
९)गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
१०)गणेश नाईक –  वन
११)दादाजी भुसे – शालेय शिक्षण
१२)संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
१३)धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
१४)मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
१५)उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
१६)जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
१७)पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
१८)अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
१९)अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
२०)शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
२१)आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान 
२२)दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
२३)अदिती तटकरे – महिला व बालविकास 
२४)शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम
२५)माणिकराव कोकाटे – कृषी 
२६)जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
२७)नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
२८)संजय सावकारे – कापड
२९)संजय शिरसाट – सामाजिक न्याय 
३०)प्रताप सरनाईक – वाहतूक 
३१)भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
३२)मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
३३)नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे 
३४)आकाश फुंडकर – कामगार 
३५)बाबासाहेब पाटील – सहकार 
३६)प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य 

राज्यमंत्री 
३७)माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 
३८) आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
३९) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
४०) इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
४१) योगेश कदम  – गृहराज्य शहर
४२) पंकज भोयर – गृहनिर्माण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here